थंडीत पोट गडबडतय? मग करा ‘हे’ उपाय

थंडीत पोट गडबडतय? मग करा ‘हे’ उपाय

black raisinsrelieves abdominal pain bloating gas and constipation

हिवाळ ऋतू अनेकांना हवाहवासा वाटतो. पण या ऋतूमध्ये विविध आजारांचा धोका वाढतोय. वाढत्या आर्द्रतेमुळे बुरशी आणि जीवाणूंची हिवाळा मोठ्याप्रमाणात वाढ होते. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. बुरशी आणि बॅक्टेरियामुळे अनेक आजार होतात. मात्र हिवाळ्यात मनुका आणि दूध पित तुम्ही या आजारांपासून मुक्त मिळू शकता. यामध्ये पॉलिफेनॉल्स, फायबर, प्रोटीन, अँटी-ऑक्सिडेंट्स, पोटॅशियमसह अनेक पोषक घटक असतात. यामुळे मनुके दुधासोबत खाणे शरीरासाठी फायदेशीर असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

काळ्या मनुक्याचे फायदे

1.मनुक्यांमध्ये असलेल्या फायबरमुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. याच्या सेवनाने गॅस, पोटं फुगवणे, बद्धकोष्ठता आणि अपचन अशा अनेक समस्यांमध्ये आराम मिळतो. यामुळे शरीरातील चयापचय क्रिया वाढते, त्यासोबतच आतड्याचे आरोग्यही चांगले राहते.

2. मनुका मधुमेह, अल्झायमर, कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. मनुके पाण्यात भिजवून ते पाणी पिल्याने शरीर तंदुरुस्त राहते.

3. मनुक्यामुळे बद्धकोष्ठता दूर करून पोट साफ होण्यास मदत मिळते. पचनसंस्थेशी संबंधित आजारांवर औषध म्हणूनही याचा उपयोग होतो. मनुकामध्ये अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट आढळतात, ज्यामुळे त्वचा सुधारते.

4. व्हिटॅमिन सीमुळे मनुका शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. मनुके गरम दुधात टाकून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच यामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करते.


Vastu Tips : दुर्भाग्य दूर करण्यासाठी आजपासूनच करा पितळेच्या भांड्याचे ‘हे’ उपाय

First Published on: November 25, 2022 4:46 PM
Exit mobile version