व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे शरीरावर दिसतात ‘ही’ पाच लक्षणं; वेळीच ओळखा नाहीतर…

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे शरीरावर दिसतात ‘ही’ पाच लक्षणं; वेळीच ओळखा नाहीतर…

सध्याच्या काळात आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता चिंतेचा विषय बनत आहे. हे असे व्हिटॅमिन आहे ज्याच्या कमतरतेमुळे शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. विशेषत: मेंदूवर त्याचा परिणाम दिसून येतो. कोणत्याही पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. आरोग्याशी संबंधित दिसणाऱ्या समस्या व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे लक्षणं आहेत. जी वेळीच ओळखणे महत्वाचे आहे.

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरतेची लक्षणं

हात- पायांना मुंग्या येणे

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे शरीराच्या 4 भागांमध्ये दिसू शकतात. यात मुख्यत: हात, पाय मांड्या, काख या शरीराच्या भागांमध्ये विचित्र प्रकारे मुंग्या येतात. त्याला पिन किंवा नीडल देखील म्हणतात. शरीरात इतर कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास अशी लक्षणे दिसू शकतात.

जिभेवर फोड येणे

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे जिभेवर फोड येणे, सूज किंवा लहान लाल पुरळ दिसू शकतात. कधी कधी जिभेवरील त्वचेचा थर निघतानाही दिसतो. यात अनेकदा जीभ गडद लाल दिसू लागते.

त्वचा पिवळसर होणे

त्वचा हलकी पिवळी दिसू लागते. असे लक्षणं दिसल्यास व्हिटॅमिन बी 12 ची चाचणी करून घ्यावी. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही त्वचा पिवळी पडते. हा पिवळसरपणा काविळीइतका खोल नसेल, पण फिकट रंग नक्कीच उठताना दिसेल.

दृष्टी कमकूवत होणे

जर तुम्हाला पाहण्यात त्रास होऊ लागला तर ही समस्या कशामुळे होत आहे याचा अंदाज लावणे कठीण होते. सध्या फोनचा वापर एवढा वाढला आहे की, पहिले लक्ष त्याकडे जाते, फोनमध्ये सतत गुंतून राहिल्यास डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते. परंतु व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे डोळे कमकुवत होऊ शकतात.

अवयवांमध्ये वेदना जाणवणे

हात आणि पाय दुखणे हे व्हिटॅमिन बी 12 चे लक्षण असू शकते. उठताना किंवा बसतानाही ही वेदना जाणवते. या व्हिटामिनच्या कमतरतेमध्ये स्नायू दुखणे सामान्य आहे. यासोबतच तुमच्या चालण्याचा वेग आणि चालण्यावरही परिणाम होऊ शकतो.

 ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश

दूध, चीज, दही, अंडी आणि शेलफिश हे व्हिटॅमिन बी12 चे चांगले स्त्रोत आहेत. तसेच व्हिटॅमिन बी 12 च्या सप्लिमेंट्सचे देखील सेवन केले जाऊ शकते.

(या माहितींची माय महानगर पुष्टी करत नाही, त्यामुळे कोणत्याही औषधांचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)


मनसे विभाग प्रमुख वृशांत वडकेला बलात्काराच्या आरोपानंतर अटक


First Published on: September 13, 2022 3:06 PM
Exit mobile version