Bra चे हूक एकसारखे का असतात?

Bra चे हूक एकसारखे का असतात?

ब्रा चा वापर सर्वच महिला करतात. बहुतांश ड्रेसमध्ये ही विविध प्रकारच्या, डिझाइनच्या ब्रा घातल्या जातात. परंतु ब्रा मध्ये एक कॉमन गोष्ट कधी तुम्ही नोटीस केलीयं का? ती म्हणजे ब्रा चे हुक्स. ते एकाच शेप आणि साइज मध्ये असे तीन लेअर दिले जातात. बॅक क्लोजर ब्रा वेळी असे तुम्हाला  त्याचे हुक्स पाठीमागे दिले जातात. पातळ स्ट्रेप असणाऱ्या ब्रा मध्ये सिंगल हुक असते. ती सुद्धा तीन लेअर मध्ये येते. नक्की असे का दिले जाते यामागील खास कारण सांगणार आहोत.

ब्रा साठी तीन रो आणि हुक्स का दिले जातात?
यामागील कारण असे की, महिलांच्या ब्रा ची कप साइज आणि बँन्ड साइज यामध्ये अंतर असते. प्रत्येकाच्या शरिराचा आकार हा वेगळा असतो. तसेच काही वेळेस एकच कप साइज असल्याने एखाद्या महिलेच्या पाठीवर अधिक फॅट्स असतील तर त्यामुळे हुक्स अॅडजस्ट करण्यासाठी ते दिले जातात.

यामागील दुसरे कारण असे की, ब्रा हुक्स ज्या पट्टीवर लावले जातात ती स्ट्रेचेबल असते. तसेच कालांतराने ती सैल ही पडते. यामुळेच जेव्हा तुम्ही एखादी नवी ब्रा खरेदी करता तेव्हा सर्वात प्रथम ती हुकमध्ये घातली पाहिजे. कालांतराने जेव्हा ती सैल होईल तेव्हा एक-एक रो पुढे करत तुम्ही ती घालू शकता. ब्रा चा हा फिचर त्याची शेल्फ लाइफ वाढवते. जर तुमचा कप साइज उत्तम असेल तर तुम्ही ती काही महिने सुद्धा वापरु शकता.

ब्रा चा बँन्ड घट्ट असेल तर काय कराल?
काही वेळेस असे होते की, आपल्या शरिरातील फॅठ वाढल्याने ब्रा चा बँन्ड घट्ट वाटू लागतो. पण कप साइज व्यवस्थितीत असतो. अशावेळी तु्म्ही ब्रा चा हुक एक्सटेंडर्सचा वापर करु शकता

ब्रा चे हुक्स एकसमान का असतात?
ब्रा चा हुक्सचा शेप आर्क किंवा चौकोनाकृती असतो. तो अशा प्रकारे तयार केला जातो की स्ट्रेपसोबत चिकटून राहिल आणि मागील बाजूस हात केला तरीही हुक्स अगदी सहज काढता आणि लावता येतील. याच कारणास्तव त्याचा आकार गोलाकार नसतो.


हेही वाचा- Bra ची परफेक्ट साइज कशी चेक कराल

First Published on: August 31, 2023 4:31 PM
Exit mobile version