ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? या वेळेत उठण्याचे फायदे जाणून घ्या

ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? या वेळेत उठण्याचे फायदे जाणून घ्या

चंदा मांडवकर :

हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्ताचे विशेष महत्व सांगितले गेले आहे. धार्मिक शास्र, वेद पुराण आणि आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा ब्रह्म मुहूर्तावर उठणे अत्यंत लाभदायक असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही सुद्धा ब्रह्म मुहूतावेळी उठत असाल तर तुम्हाला सौंदर्य, बळ, विद्या, बुद्धी आणि आरोग्याची प्राप्ती होते. तसेच तुमचा संपूर्ण दिवस हा उर्जेने भरलेला राहतो. कामात यश मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे ब्रह्म मुहूर्तावेळी पूजा-पाठ करत असाल तर तुमची प्रार्थना थेट देवापर्यंत पोहचली जाते असे ही मानले जाते. तर पाहूयात ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की काय? तसेच या वेळेत उठण्याचे काय फायदे होतात त्याबद्दलच अधिक.

ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय? ब्रह्म अर्थात परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे वेळ. तर ब्रह्ममुहूर्त म्हणजेच परमात्म्याची वेळ. ही वेळ म्हणजे मध्यरात्रीच्या मधला काळ. पहाटे ४ ते ५.३० दरम्यानच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त असे म्हटले जाते. तर ब्रह्म मुहूर्त हा रात्रीचा चौथा प्रहर असतो.

ब्रह्म मुहूर्ताचे महत्व काय?

हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्त सर्वाधिक उत्तम मानला गेला आहे. पौराणिक काळात जे ऋषीमुनी असायचे ते ध्यान करण्यासाठी बसण्यासाठीची ही वेळ योग्य मानायचे. यावेळी करण्यात आलेल्या देवाच्या पुजेचे फळ लवकर प्राप्त होते. मंदिरांचे दरवाजे ही ब्रह्म मुहूर्तावेळी उघडले जातात. पुराणांनुसार, या वेळी झोपल्यास ब्रम्ह मुहूताचे पुण्य नष्ट होते.

ब्रह्म मुहूतावेळी उठण्याचे ‘हे’ होतात फायदे

 


हेही वाचा :

तुम्ही सुद्धा पायात चांदीचे पैजण घालता तर ‘हे’ नक्कीच वाचा

First Published on: January 24, 2023 5:24 PM
Exit mobile version