करोनापासून वाचण्यासाठी ब्रोकोली सूप फायदेशीर

करोनापासून वाचण्यासाठी ब्रोकोली सूप फायदेशीर

जगभरात करोना व्हायरसचा धोका सतत वाढत आहे. त्यामुळे आपले आरोग्यकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसंच प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खाणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. जर आपली प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपल्या करोनाचा संसर्ग होणार नाही. ब्रोकोली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे आज आपण ब्रोकोली सूपची रेसिपी पाहणार आहोत. आताच्या परिस्थिती ब्रोकोलीचे सूप खूप फायदेशीर आहे.

साहित्य

२५० ग्रॅम ब्रोकोली, दोन टोमॅटो बारीक चिरलेले, दोन बडाडे बारीक चिरलेले, थोडी काळी मिरची, ४ ते ५ लवंग, आलं, थोडी दालचिनी, कोथिंबीर, दोन चमचे दही आणि चवीनुसार मिठ

कृती

पहिल्यांदा ब्रोकोलीला पाच मिनिटं पाण्यात उकळून घ्या. नंतर एका पॅनमध्ये दही टाकून त्याच्यात काळी मिरची, लवंग आणि दालचिनीची पूड घाला. मग आलं, बटाटे, टोमॅटो आणि थोड पाणी घालून काही वेळासाठी शिजवत ठेवा. त्यानंतर सर्व मिश्रण बारीक करून घ्या. आता एका पॅनमध्ये ब्रोकोली, बारीक कापलेले बटाटे आणि टोमॅटो आणि आलं दोन ते तीन मिनिटं शिजवा. त्यानंतर चवीनुसार त्यात मीठ घाला. बारीक केलेले मिश्रण मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यावर कोथिंबिर घाला

First Published on: March 30, 2020 6:15 AM
Exit mobile version