कार चालवताना हाय हील सँडल वापरता का? मग व्हा सावध

कार चालवताना हाय हील सँडल वापरता का? मग व्हा सावध

कार चालवताना हाय हील सँडल वापरता का? मग व्हा सावध

सध्या हाय हिल् सँडलचा जमाना आहे. अनेक प्रकारच्या हिल्स बाजारात उपलब्ध आहेत. अनेक महिला या हाय हिल सँडल घातलताना. हाय हिल सँडल कोणत्याही कार्यक्रमात छान दिसतात. त्यामुळे एक वेगळा लुक तयार होतो. मात्र त्यात हिल्स घालून जर ड्रायविंग करायची असेल तर ते मात्र शक्य होत नाही. त्यामुळे शक्यतो ड्रायविंग करताना हाय हिल सँडल घालणे टाळले पाहिजे. ड्रायविंग करताना हाय हिल सँडल घातल्यास कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते ते जाणून घ्या.

ड्रायविंग करताना एकदम सरळ बसावे लागते. त्याचप्रमाणे सतत एक्सेलीटर, क्लच आणि ब्रेक मारावा लागतो. अशा वेळी हाय हिल सँडल घालून बसले तर गाडी चालवणे कठिण होईल. त्यामुळे कधीही गाडी चालवताना फ्लॅट चप्पलांचा वापर करावा. हाय हिल सँडल या थोड्या टोकदार असतात. गाडीच्या आतमध्ये असलेले मॅटही यामुळे फाटण्याची शक्यता असते. मॅटमध्ये जर तुमचा पाय अडकला तर ब्रेक मारताना फाटलेले मॅट पायाखाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्रेक किंवा एक्सेलेटर लावताना मोठी अडचण निर्माण होऊ शकते.

हाय हिल सँडल घातल्याने बऱ्याच वेळा महिलांना ड्रायविंगचा अंदाज लावता येत नाही. कारण हिल्समुळे ब्रेक किंवा एक्सिलेटरवर किती जोर द्यायचा याचा अंदाज लागत नाही. किती ब्रेक मारायचा याचा अंदाज आला नाही तर दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते.


हेही वाचा – बदलत्या मोसमात चुकूनही करु नका ‘या’ चूका, करावा लागेल आजाराचा सामना

First Published on: March 1, 2021 11:14 PM
Exit mobile version