रिलेशनशिपमध्ये पार्टनरला Cheat केलंय तर, माफीही मागा

रिलेशनशिपमध्ये पार्टनरला Cheat केलंय तर, माफीही मागा

कोणीतरी योग्यच म्हटले आहे की, भावनांवर कोणाचेच नियंत्रण नसते. त्यामुळेच काही वेळेस असे होते की, तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तरीही तिसरा व्यक्ती तुम्हाला आवडतो. तुम्ही त्या व्यक्तिशी भावनात्मक रुपात जोडले जाता. पण जेव्हा तिसरा व्यक्ती आणि तुमच्यात अधिक जवळीकता येते तेव्हा तुम्ही पार्टनरला फसवत असल्याची भावना ही मनात निर्माण होते. हिच भावना तुम्हाला मनात सतत खात राहते. अशातच ही गोष्ट जर तु्म्हाला पार्टनरला सांगायची असेल तर नक्की काय करावे हे कळत नसेल तर थांबा, आम्ही तुम्हाला याच बद्दल अधिक सांगणार आहोत.

पार्टनरला सर्वकाही स्पष्टपणे सांगा
जेव्हा तुम्हाला पार्टनरला तुम्ही रिलेशनशिपमध्ये चिट केलेयं हे सांगणे जमत नसेल तर थोडा वेळ घ्या. विचार करा. पण पार्टनरला जे काही झाले आहे ते स्पष्टपणे सांगा. जेणेकरुन पुढे जाऊन तुमच्या नात्यात वाद होणार नाही. एकदा का पार्टनरच्या विश्वासाला तडा गेल्यास तर तुमच्यावर तो सहज विश्वास ठेवणार नाही.

यावेळी असे ही होऊ शकते की, तुम्ही जे सांगत आहात त्यामुळे पार्टनरला वाईट वाटू शकते. अथवा ते तुमच्यावर संतप्त ही होतील. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वत:ला तयार करा. त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सांगा तुमच्याकडून अशी चुक पुन्हा होणार नाही. तुम्ही भले तुमची चूक सुधारण्यासाठी खुप प्रयत्न करतायत. पण यावेळी लक्षात ठेवा, तुमच्या मुलांना याबद्दल काहीच कळू देऊ नका. कारण त्यांच्यावर याचा परिणाम होऊ शकतो.

पण पार्टनरला सांगितल्यानंतर ही तो तुमच्याशी नीट वागण्यास तयार नसेल तर अशावेळी घरातील एखाद्याची मदत घ्या. तुम्ही चुकला आहात तर मदतीसाठी कोणाला तरी बोलवा. त्यांना तुमच्या सर्व गोष्टी सांगा आणि त्यांचा सल्ला ऐकून घ्या. यावेळी तुम्ही ईमानदारीने सर्वकाही त्यांना सांगा. तुमचा येथे इगो मध्ये आणू नका. अशा नाजुक स्थितीत तुमचा ईगो पुढे ठेवल्यास तर काही गोष्टींवर तोडगा निघण्याऐवजी अधिक गुंतागुंतीच्या होतील.

या व्यतिरिक्त एकदा नात्यात अविश्वास निर्माण झालाय म्हणजे ते नाते पुन्हा कधीच जोडले जाऊ शकत नाही. पार्टनर जर तुमची माफी मागत असेल आणि केलेली चुक मान्य करत असेल तर त्यांना माफ करा.


हेही वाचा- आनंदी राहण्यासाठी स्वत:सह पार्टनरला ठेवा खुश

First Published on: April 26, 2023 5:55 PM
Exit mobile version