Friday, April 26, 2024
घरमानिनीआनंदी राहण्यासाठी स्वत:सह पार्टनरला ठेवा खुश

आनंदी राहण्यासाठी स्वत:सह पार्टनरला ठेवा खुश

Subscribe

“नात्यापेक्षा स्वत: चा मी पणा मोठा असेल तर नाती बनवू नये” हे नेहमीच बोलले जाते. हे वाक्य खरं आहे. कारण जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये येता तेव्हा तुम्हाला तुमच्यासह पार्टनरच्या व्यक्तिमत्वाला जसे आहे तसे स्विकारावे. प्रत्येक व्यक्तीचे वागणे, बोलणे हे वेगवेगळे असते. अशातच पार्टनरला समजून घेणे हे तुमच्या हातात असते. आयुष्यात तुम्हाला आनंदी रहायचे असेल तर नेहमीच लक्षात ठेवा, स्वत:सह पार्टनरला खुश ठेवा. तरच तुमच्या नात्यात गोडवा कायम टिकून राहिल. दोघांनी एकमेकांना समजून घेणे फार आवश्यक आहे. त्याचसोबत तुमच्या नात्यात विश्वास ही असावा.

आयुष्यात प्रत्येकालाच आनंदित रहावे असे वाटत असते. पण आजकाल लोक अधिक तणावाखाली राहतात आणि त्याचाच राग पार्टनरवर निघतो. परंतु असे करण्यापासून दूर रहा. जर तुम्हाला आयुष्यात आनंदित रहायचे असेल तर पार्टनरवर वेळोवेळी राग काढण्याऐवजी त्यावर काहीतरी सोल्यूशन काढा. अथवा आयुष्यात लहानलहान बदल करा. तरच तुम्ही स्वत:सह पार्टनरला खुश ठेवू शकता.

- Advertisement -

आयुष्यात आनंदी राहण्याची साधी सरळ पद्धत म्हणजे दुसऱ्यांसोबत तुलना करणे बंद करा. आजकाल बहुतांश लोकांमध्ये असे दिसून येते की, त्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याला अधिक महत्व दिले जात नाही. केवळ दुसऱ्यांसोबत तुलना करुन ते जसे करतात तशी कॉपी करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु नात्यात अशी चुक कधीच करु नका. कारण समोरचा व्यक्ती त्या नक्की कोणत्या हेतूने करत आहेत हे आपल्याला माहिती नसते. आपल्याला ज्या काही गोष्टी वरवर दिसतात त्या आतमधून वेगळ्या सुद्धा असू शकतात. त्यामुळेच आयुष्यात तुम्हाला आनंदी रहायचे असेल तर स्वत:सह पार्टनरची इतरांशी तुलना करणे बंद करा. ही सवय जेव्हा तुम्ही बंद कराल तेव्हा तुम्ही स्वत:सह पार्टनरसाठी आनंदित पहाल.

काही वेळेस असे ही होते की, एखाद्या गोष्टीवरुन तुम्ही अथवा पार्टनर नाराज होतो. तेव्हा एकमेकांना वेळ दिला पाहिजे. जेव्हा व्यक्ती एकटेपणात थोडावेळ घालवतो तेव्हा काही गोष्टींवर योग्य विचार करु शकतो. तुम्हाला तसे जमत नसेल तर पार्टनरशी बोला. त्याच्याकडून तुमच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे मनं हलके होईलच पण तुमच्या नात्यात विश्वास अधिक वाढेल. जेव्हा नात्यात विश्वास, भावना असतात तेव्हाच आपण स्वत:सह समोरच्या व्यक्तीला आनंदित ठेवू शकतो. नाते हे एकट्याचे नसून दोघांचे असते हे लक्षात ठेवा.

- Advertisement -

या व्यतिरिक्त आनंदित राहण्यासाठी तुम्हाला दुसरा व्यक्ती काय बोलला, तो कसा वागला, खरंच ते बरोबर होते की चुकीचे असा विचार करणे विसरा. दुसऱ्यांचे बोलणे डोक्यात ठेवून आपण कधीकधी त्यावरच अधिक विचार करत राहतो आणि आपल्याला आतमधून दु:खी वाटते. पण आनंदित रहायचे असेल तर समोरच्या व्यक्तीला माफ करा आणि पुढे जा. यामुळे तुमचे मन शांत होईलच. पण जेव्हा पार्टनर तुम्हाला या स्थिती बद्दल विचारेल तेव्हा तुम्ही शांपणे त्याला उत्तर देऊ शकता. कारण एकमेकांच्या आयुष्यातील सुख-दु:ख ही आयुष्यावर प्रभाव टाकत असतात हे लक्षात ठेवा.

काही जणांना असे वाटते की, पैसा आला तरच आनंद येतो. पण असा विचार करणे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही तुमचा आनंद लहानलहान गोष्टीतून शोधू शकता. एखादी तुमची आवडती कला असो किंवा छंद. त्यामध्ये तुमचे मन रमवा. असे करताना तुम्ही आनंदित असाल तरच पार्टनर समोर गेल्यानंतर ही तिच भावना तुमच्या चेहऱ्यावर दिसून येईल. नात्यात केवळ मी पणा ठरुन ठेवण्याऐवजी दोघांनी मिळून काही गोष्टी केल्या तरच नात्यात आनंद राहिल. एकमेकांचा आनंद कशात आहे हे जाणुन घेतला तरच तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्यासह पार्टनरला खुश ठेवू शकता.

 


हेही वाचा- ‘या’ संकेतावरून ओळखा तुमचं relationship strong आहे का?

- Advertisment -

Manini