रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात करा ‘या’ 4 प्रकारच्या लाडवांचे सेवन

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात करा ‘या’ 4 प्रकारच्या लाडवांचे  सेवन

हिवाळ्यात वातावरणात प्रचंड गारठा असतो. त्यामुळे शरीर मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक आहार करण्याचा सल्ला दिला जातो. या काळात अनेकजण विविध पौष्टिक लाडवांचे देखील सेवन करतात. यांचे सेवन केल्यास कॅल्शियम, व्हिटॅमीन्स आपल्याला मुबलक प्रमाणात मिळते.

थंडीत करा ‘या’ लाडवांचे सेवन

अनेकजण गुडखे दूर करण्यासाठी मेथीच्या लाडवांचे सेवन करतात. मेथीमध्ये व्हिटॅमीन ए.बी.सी, आयर्न, मॅग्नीशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम असतात. जे वजन, मधुमेह, उच्च रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर आहे. या लाडवाचे सेवन केल्याने हाडं मजबूत होतात.

डिंकांच्या लाडवांमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम असतात. यामुळे शरीरातील हाडं मजबूत होतात. तसेच हे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण भरुन काढते.

तीळा गरम असतात त्यामुळे ते थंडीत मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. तीळाच्या लाडवाचे सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. यामध्ये व्हिटॅमीन्स , आयर्न, मॅग्नीशियम, कॅल्शियम, पोटॅशियम असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

हिवाळ्यात ड्राय फ्रुट्सचे लाडू खाल्लाने मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.

 


हेही वाचा : 

Recipe : मूग सॅलड…

First Published on: January 13, 2024 12:12 PM
Exit mobile version