कोथिंबीरचे त्वचेसाठी होणारे लाभदायक फायदे

कोथिंबीरचे त्वचेसाठी होणारे लाभदायक फायदे

कोथिंबीरचे त्वचेसाठी होणारे लाभदायक फायदे

जेवणाची चव वाढवण्यासाठी कोथिंबीरचा सर्रास वापर केला जातो. तर बऱ्याचदा एखादा पदार्थ उठून दिसण्यासाठी देखील सुशोभिकरणाकरता कोथिंबीर हमखास वापरली जाते. पण, कोथिंबीर जेवढी जेवणात महत्त्वाची आहे. तितकाच सौंदर्याकरताही तिचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया. कोथिंबीरचे त्वचेच्या आरोग्यासाठी होणारे फायदे.

चेहऱ्यावरील सुरकुत्या

वय वाढते तसे चेहऱ्यावर सुरकुत्याही पडण्यास सुरुवात होते. अशावेळी चेहऱ्यावरी सुरकुत्या दूर करण्यासाठी कोथिंबीरचा वापर करु शकता. याकरता कोथिंबीरची पाने वाटून घेऊन ती कोरफडीच्या गरात मिक्स करुन ती पेस्ट चेहऱ्यावर लावावी. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

पिंपल्स कमी होतात

चेहऱ्यावर असणारे पिंपल्स सौंदर्यात बाधा आणतात. अशावेळी कोथिंबीर आणि लिंबू हा फेसपॅक चेहऱ्याला लावावा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.

डेड स्कीन

कोथिंबीर ही आपल्या त्वचेवरच्या डेड स्कीन सेल्सला काढून टाकते. त्यामुळे त्वचा सतेज होण्यासाठी मदत होते.

चेहऱ्यावरील डाग

पिंपल्स आल्यावर अनेकजण ते फोडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे चेहऱ्यावर डाग पडतात. हे डाग घालवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते कमी होत नाही. अशावेळी लिंबात जास्त प्रमाणात असणाऱ्या व्हिटामिन ‘सी’ मुळे त्वचेवरचे डाग फिकट होण्यासाठी मदत होते. याकरता कोथिंबीर आणि लिंबाचा रस एकत्र करुन तो फेसपॅक चेहऱ्याला लावावा आणि १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा.

चेहरा उजळण्यासाठी

कोथिंबीर वाटून घेऊन त्यात दुध, मध, लिंबू घालून व्यवस्थित मिक्स करून पेस्ट करून घ्यावी. हा घरगुती फेसपॅक पूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून ठेवायचा. सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवून, कोरडा करावा. यामुळे चेहऱ्यावरचा टॅन कमी होऊन चेहरा उजळण्यासाठी उपयोग होईल.

First Published on: December 14, 2020 6:43 AM
Exit mobile version