बाजारात आली कोरोना हेअर स्टाईल, पहा फोटो

बाजारात आली कोरोना हेअर स्टाईल, पहा फोटो

बाजारात आली कोरोना हेअर स्टाईल

जगातील सुमारे २०० देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यान, लोकांच्या सामान्य दिनचर्या, राहणीमान, रोजगार, जेवण इत्यादी बाबींवर परिणाम होत असताना लोकांसमोर वाढत्या केसांबद्दल एक समस्या आहे. घरी दाढी करणे शक्य आहे, परंतु केस कापणं कठीण आहे. बहुतेक सलून, ब्युटी पार्लर इत्यादी बंद आहेत. बहुतेक देशांमध्ये ही समस्या आहे. दुसरीकडे, पूर्व आफ्रिकेत सध्या ‘कोरोना विषाणू हेअर स्टाईल’ खूप लोकप्रिय होत आहे. केनियामधील मुलांमध्ये ही हेअर स्टाईल खूप लोकप्रिय आहे.


हेही वाचा – विशाखापट्टणम वायू गळती: दक्षिण कोरियाला १३ हजार टन स्टायरिन वायू परत पाठणार


या केशरचनाद्वारे लोक कोरोनाबद्दल जागरूकताही करीत आहेत. विषाणूचा धोका खरोखर गंभीर आहे हे सांगण्याचा हे लोक प्रयत्न करीत आहेत. अफ्रीकामधील सलूनमध्ये विदेशी केशरचना असलेल्या केसांची छायाचित्रे आहेत. द गार्डियनच्या वृत्तानुसार, केनियाची राजधानी नैरोबी येथील २४ वर्षीय हेअरड्रेसर शेरॉन रेफाने झोपडपट्टीतील मुलांच्या केसांचे आणि तरूणांचे केस स्पाइक्ससारखे डिझाइन केले होते. याला ‘कोरोना विषाणू हेअर स्टाईल’ असं म्हणतात. काही लोक कोरोना विषाणूला गंभीर मानत नाहीत, परंतु बहुतेक लहान मुले आपले हात स्वच्छ करण्यापासून मास्क लावण्यापर्यंत जागरूक आहेत.

मार्गारेट एंडिया म्हणते की ‘कोरोना विषाणू हेअर स्टाईल’ तिच्या मुलींना शोभून दिसत आहे. एंडिया सांगते की ही हेअर स्टाईल त्यांच्यासाठी अत्यंत परवडणारी आहे जे महाग हेअर स्टाईलसाठी पैसे देऊ शकत नाहीत.

 

First Published on: May 12, 2020 12:16 PM
Exit mobile version