घरदेश-विदेशविशाखापट्टणम वायू गळती: दक्षिण कोरियाला १३ हजार टन स्टायरिन वायू परत पाठणार

विशाखापट्टणम वायू गळती: दक्षिण कोरियाला १३ हजार टन स्टायरिन वायू परत पाठणार

Subscribe

विशाखापट्टणममधील स्टायरिन वायू गळतीनंतर सुमारे १३,००० टन स्टायरिन वायू कंपनीचे मुख्यालय सोल येथे परत पाठवण्यासाठी खास टँकर जहाजाची व्यवस्था केली आहे.

विशाखापट्टणममधील एलजी पॉलिमर प्लांटमधून विषारी ज्वलनशील वायू गळतीनंतर सुमारे १३,००० टन स्टायरिन वायू कंपनीच्या दक्षिण कोरियामधील मुख्यालयात परत पाठवला जात आहे. वायू गळतीतील लोकांच्या मृत्यूनंतर हे पाऊल उचललं गेलं आहे. या वायू गळतीमुळे मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडले आहेत.

विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी व्ही. विनय चंद म्हणाले, “आम्ही सोमवारी ८००० टन स्टायरिन कंटेनरमधून पाठवत आहोत. उर्वरित ५००० टन पुढील काही दिवसांत पाठवला जाईल.” आर.आर. व्यंकटपुरम येथील एलजी पॉलिमर प्लांटच्या टाकीमध्ये स्टायरिन वायू ठेवण्यात आला होता. विशाखापट्टणम बंदरावर कंपनीने दोन टाक्यांमध्ये स्टायरिन वायू ठेवला होता, जो सिंगापूरहून आयात केला होता. आंध्र प्रदेश सरकारने केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाशी बोलल्यानंतर कंपनीचे मुख्यालय सोल येथे स्टायरिन वायू परत पाठवण्यासाठी खास टँकर जहाजाची व्यवस्था केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नागरी उड्डाण मंत्रालयाने दाखवलं भविष्यातील हवाई प्रवासाचं चित्र


७ मे रोजी झालेल्या वायू गळतीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १००० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी व्यंकटपुरम आणि आसपासच्या गावातील लोकांनी मृतदेहांसह प्लांटसमोर निदर्शने केली आणि हा प्लांट बंद करण्याची मागणी केली. यानंतर हा प्लांट पूर्णपणे बंद करण्यात आला. सोमवारी परिसरात परिस्थिती नियंत्रणात राहिली. मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला १ कोटी देणार असल्याची घोषणा आंध्र प्रदेश सरकारने केली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -