रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आवळ्याची चटणी जरूर करा

रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आवळ्याची चटणी जरूर करा

रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आवळ्याची चटणी जरूर करा

आवळामध्ये तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतील असे बरेच घटक आहेत. आवळ्यामधील व्हिटॅमीन सी तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करते. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत आवळ्याचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आज आपण आवळ्याची चटणी कशी करतात हे जाणून घेणार आहोत.

साहित्य

आवळा १०० ग्रॅम, कोथिंबीर १०० ग्रॅम, हिरवी मिरची ४, हिंग चिमुटभर, जीरा १ टिस्पून, चवीनुसार मीठ, लाल मिरची, लसणीच्या ५ पाकळ्या आणि तेल

कृती

सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर आवळ्यातल्या बिया काढून मिक्सरला बारिक करून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून पुन्हा आवळ्यात टाकून बारीक करून घ्या. एका कडईत तेल ओतून त्यात बारीक झालेले मिश्रण घाला. मग त्यात लाल मिरची, जीरे घालून परतवून घ्या. अशाप्रकारे झाली तुमची आवळ्याची चटणी

First Published on: April 13, 2020 6:15 AM
Exit mobile version