Diabetes Symptoms | डोळ्यांत दिसणारी ‘ही’ लक्षणे आहेत मधुमेहाचे संकेत: तुम्हीही दुर्लक्ष करत असाल तर….

Diabetes Symptoms | डोळ्यांत दिसणारी ‘ही’ लक्षणे आहेत मधुमेहाचे संकेत: तुम्हीही दुर्लक्ष करत असाल तर….

Diabetes Symptoms | डोळ्यांत दिसणारी 'ही' लक्षणे आहेत मधुमेहाचे संकेत: तुम्हीही दुर्लक्ष करत असाल तर....

मधुमेह हा आजार लोकांमध्ये आता सामान्य झाला आहे. मात्र सामान्य दिसणारा हा आजार अनेकांसाठी आता जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे या आजारापासून दूर राहण्यासाठी नियमित व्यायाम, जंक फूड न खाणे, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा रस सेवन करणे गरजेचे आहे. मधुमेह झालेल्या व्यक्तीला खूप पत्थ पाळावी लागतात. या आजाराने आपली रोग प्रतिकारशक्ती कमजोर होते.ज्यामुळे रुग्णास कोणताही आजार होऊ शकतो. शरीरावर छोटीशी जखम झाली तरी रक्तातील साखरेच्या प्रमाणामुळे ती जखम लवकर बरी होत नाही. यामुळे आपल्याला आवडत्या गोष्टी खाता येत नाही. मधुमेह का होतो आणि झाल्यावर तो कसा ओळखून शकतो हे तुम्हाला सांगणार आहोत, तसेच डोळ्यांत दिसणारी अशी काही लक्षणे आहेत जी तुम्हाला मधुमेह झाली की नाही याचे संकेत देतात. आणि रक्तातील ग्लूकोज म्हणजे साखरेत वाढ होते. यालाच मधुमेह म्हटले जाते.

खालील लक्षणांकडे केव्हाही दुर्लक्ष करू नका – 

1) भूक लागणे

शरीरात प्री डायबिटीजची स्थिती निर्माण झालेली असल्याने किती खाल्ले तरी भूक शांत होत नाही. अन्न खाऊन 5-6 तास झाले तरी पुन्हा खावेसे वाटते ज्याला मधुमेहाचे लक्षण म्हटले जाते. यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण जास्त झाले असे समजते.

2) सतत थकवा जाणवणे

इन्सुलिन रेझीस्टनमुळे ग्लुकोजचे उर्जेत परिवर्तन न झाल्याने शरीरात थकवा जाणवतो.

3) सतत तहान लागणे

मधुमेहाच्या रुग्णाला सारखी लघवी येते. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी आणि घशाला कोरड पडतो. यामुळे रुग्णाला सतत तहान लागते.

४) त्वचेला खाज येणे

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने अवयवांना पाणी पुरवठ्याची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे खाज येत असते.

५) डोळ्यांना अंधुक दिसणे

डोळ्यामध्ये अत्यंत नाजूक रक्तवाहिन्या असतात. आणि ग्लुकोजचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नसल्याने त्यांना ईजा होते. त्यामुळे धुरकट किंवा अस्पष्ट दिसते.

६) जखम बरी न होणे

ग्लुकोजचे प्रमाण वाढल्याने रक्तातील घाव बरे करणारा घटक कमी होतो आणि जखमसुद्धा बरी होण्यासाठी खूप दिवस जातात. यामुळे त्याचे रूपांतर गँग्रीनमध्ये होते.

७) अवयवयांना संवेदना न जाणवणे  

शरीरामध्ये लहान रक्तावाहिन्या असतात. वाढत्या ग्लुकोजमुळे त्यांना इजा होते. रक्ताभिसरण नीट होत नाही त्यामुळे अवयवांना संवेदना जाणवत नाहीत.

८) लहान मुलांनाही मधुमेहाचा धोका जाणवणे

गादीवर लघवी न करणाऱ्या मुलांना अचानक गादीवर लघवी झाल्याने त्याला मधुमेह असू शकते.


China Plane Crash : चीनच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॕक बॉक्सचा तपास सुरू, १३२ जणांच्या फ्लाईटमध्ये सर्वांचाच मृत्यू झाल्याचे घोषित

First Published on: March 27, 2022 2:32 PM
Exit mobile version