वायु प्रदुषणाशी लढण्यासाठी या गोष्टी नक्की करा!!

वायु प्रदुषणाशी लढण्यासाठी या गोष्टी नक्की करा!!

हृदय शस्त्रक्रीया

जगभरात दिवसेंदिवस वायु प्रदुषण वाढताना दिसत आहे. वायुप्रदुषणामुळे जगभरात ९० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर देशात २५ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे वायु प्रदुषणामुळे लोकांना मोठ्या प्रमाणावर आजारांचा देखील सामना करावा लागत आहे. वाढत्या वायुप्रदुषणामुळे लोकांना घशाचे किंवा श्वसनाचे देखील त्रास होत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन सध्या केलं जात आहे. पण, त्यासाठी तुमचं शरीर देखील तितकंच सक्षम असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काही खालील गोष्टी करणं गरजेचं आहे.

१ ) व्हिटॅमिन Cचं सेवन करा
व्हिटॅमिन C तुम्हाला तंदुरूस्त ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं. तुमच्या शररीमध्ये असलेलं व्हिटॅमिन C तुमच्या शरीरातील पेशी तंदुरूस्त ठेवण्यासाठी मदत करतं. त्यासाठी फळांचं सेवन देखील महत्त्वाचं आहे. संत्री, लिंबू, आवळा आणि पेरूमध्ये व्हिटॅमिन Cचं प्रमाण जास्त असतं
२ ) व्हिटॅमिन Eचं तुमच्या खाण्यामध्ये समावेश करा
तुमच्या खाण्यामध्ये व्हिटॅमिन E देणाऱ्या पदार्थांचा देखाल समावेश असावा. कारण, antioxidant activity रोखण्यासाठी व्हिटॅमिन E महत्त्वाची भूमिका बजावते. हिरव्या भाज्या, गाजर, पालक आणि radish leavesमधून देखील तुम्हाला व्हिटॅमिन E मिळतं. 

३ ) ओमेगा – ३ फॅटी अॅसिड

ओमेगा – ३ फॅटी अॅसिड तुमच्या ह्रद्याचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत करतं. जेणेकरून तुम्हाला श्वसन प्रक्रियेमध्ये त्रास होणार नाही. बदाम, अक्रोड, काळा चना आणि राजमा यांसारख्या पदार्थांमधून मोठया प्रमाणात ओमेगा – ३ फॅटी अॅसिड मिळतं.
४ ) प्रोटीन्सयुक्त खाणं
प्रोटीन्सयुक्त पदार्थ खाण्याला प्राधान्य द्या, कारण त्यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. 

 

वाचा – वायु प्रदुषणामुळे ९० लाख लोकांचा मृत्यू

First Published on: November 13, 2018 3:55 PM
Exit mobile version