भांडी घासताना साबण गळतोय, मग वापरा ‘ही’ आयडिया

भांडी घासताना साबण गळतोय, मग वापरा ‘ही’ आयडिया

सर्व महिलांना असे वाटते की, जेव्हा भांडी घासतो तेव्हा ती चमकावीत आणि त्यावरील बॅक्टेरिया निघून जावेत. अशातच मार्केटमध्ये विविध प्रकारचे डिशवॉश मिळतात. परंतु या डिशवॉशरची किंमत अधिक असते आणि जर ते खरेदी केल्यानंतर तुमचे बजेट बिघडू शकते. या व्यतिरिक्त डिशवॉश साबणाने सतत भांडी घासल्याने पाणी अधिक वापरले जाते आणि साबण ओला राहतो. अशातच तो लवकर संपतो. काही वेळेस साबण व्यवस्थितीत धुतला नाही तर तो भांड्यावर चिकटून राहतो. याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आरोग्यासाठी समस्या उद्भवण्यासारखे आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला लिक्विड डिश वॉश साबण कसा बनवायचा याच बद्दल सांगणार आहोत.(Dishwasher soap ideas)

लिक्विड डिशवॉशर बनवण्यासाठी लागणारी सामग्री
-एक चतुर्थांश डिशवॉश बार
-दोन चमचे व्हिनेगर
-एक चमचा मीठ
-स्टोर करण्यासाठी बॉटल
-एक ते दीड ग्लास पाणी

लिक्विड डिशवॉशर बनवण्याची क्रिया
-सर्वात प्रथम वरती दिलेल्या सामग्री एकत्रित करुन घ्या. आता किसणीच्या मदतीने एक चतुर्थांश आलं एका वाटीत किसून घ्या.
-आता एक ते दीड ग्लास पाणी मिक्स करुन त्यात साबण आणि पाणी व्यवस्थितीत मिक्स करा
-साबण पाण्यात मिक्स केल्यानंतर त्यात एक चमचा मीठ आणि दोन चमचे विनेगर टाका
-सर्व गोष्टी मिक्स केल्यानंतर त्या बॉटलमध्ये व्यवस्थितीत स्टोर करा (Dishwasher soap ideas)

कसा वापर कराल?
-जेव्हा तुम्ही भांडी घासण्यासाठी साबण वापराल तेव्हा एका वाटीत ते घ्या.
-भांडी घासण्यासाठी स्क्रबर घ्या आणि त्याला त्या लिक्विडमध्ये बुडवा.
-स्क्रबरने भांडी घासून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि सुती कापडाने ते पुसा.
-तुमची भांडी साबणाच्या डागांशिवाय स्वच्छ होईल.


हेही वाचा- स्मार्ट किचनमध्ये हे Appliances असायलाच हवेत, कोणते ते बघा…

First Published on: June 7, 2023 5:13 PM
Exit mobile version