आपलेसुद्धा पाय सतत दुखतात का? मग करा ‘हे’ उपाय

आपलेसुद्धा पाय सतत दुखतात का? मग करा ‘हे’ उपाय

दिवसभर काम केल्यानंतर अनेकांकडून तुम्ही ऐकलं असेल की रात्री झोपताना खूप पाय दुखतात. ज्यामुळे त्यांना रात्रभर झोप लागत नाही. त्यामुळे झोप अपूर्ण झाल्याने दुसरा दिवस पूर्ण आळस जाणवतो. शिवाय अपूर्ण झोपेमुळे अनेक आजारांच्या समस्या देखील उद्भवतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी पाय दुखू नयेत यासाठी घरच्या घरी हे उपाय करा.

पाय दुखी पासून सुटका होण्यासाठी करा ‘हे’ उपाय

मोहरीचे तेल


जर तुमचे पाय सतत दुखत असतील तर अशावेळी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी पायांना मोहरीचे तेल लावून मसाज करा.

लवंग तेल


रोज रात्री लवंगाच्या तेलाने मालीश केल्यामुळे देखील पायदुखी थांबू शकते.

मेथी


मेथी सुद्धा पाय दुखीसाठी खूप उपयुक्त आहे. त्यासाठी रात्रभर चमचा मेथी भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर त्या मेथीचे सेवन करा.

व्यायाम


नियमीत व्यायाम केल्याने देखील पाय दुखी थांबू शकते. व्यायाम केल्याने शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होतो. त्याचा फायदा पाय दुखीवर होऊ शकतो.


हेही वाचा :Coconut oil benefits : केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल रामबाण उपाय; ‘या’ पद्धतीने वापर करा

First Published on: August 9, 2022 5:02 PM
Exit mobile version