उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे म्हणजे डायबिटीज-डायरिया-डिहायड्रेशनला आमंत्रण

उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे म्हणजे डायबिटीज-डायरिया-डिहायड्रेशनला आमंत्रण

उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे म्हणजे डायबिटीज-डायरिया-डिहायड्रेशनला आमंत्रण

मार्च महिना सुरू झाला की चाहूल लागते ती उन्हाळ्याची आणि त्याचबरोबर आंब्याची. कारण उन्हाळ्यात आंबा खाण्याची मजा काही औरच असते. पण नुसता आंबा खाऊन उन्हाळ्यात समाधान मिळत नाही तर त्यासोबत थंडाथंडा कूलकूल आईस्क्रिमही असतचं. पण हे दोन्ही पदार्थ या सिझनमध्ये खाणं म्हणजे डायबेटीस, स्थूलपणा, डिहाड्रेशन आणि डायरियाला आमंत्रण आहे. असे तज्त्रांनी सांगितले आहे.

 

ऊन्हाळ्यात तापमान वाढल्याने हिट वाढलेली असते. शरीराचे तापमानही वाढते. अशावेळी शरीराला थंडावा मिळण्यासाठी आइस्क्रीम खाल्ले जाते. आइसक्रीम मध्ये साखरेते प्रमाण अधिक असते. ज्याच्यामुळे डायबेटीस आणि लठ्ठपणा वाढतो.

तसेच सूका मेवा म्हणजे बदाम, अक्रोड, काजू, हे शरीरासाठी जरी आरोग्यदायी असले तरी ते गुणधर्माने ते गरम असतात. यामुळे ऊन्हाळ्यात या सुक्यामेव्याचे सेवन प्रमाणात करावे. सूका मेवा हा शरीरात उष्णता निर्माण करतो. पण ऊन्हाळ्यात त्याच अतीसेवन धोकादायक ठरु शकतं. डायरिया म्हणजेच जुलाब, हगवण असे आजार होतात. यामुळे या दिवसात सुका मेवा खाणे टाळलेले बरे.

आंबा हा ऊन्हाळ्याच्या दिवसात घरोघरी मिळणार फळ आहे. पण जास्त आंबे खाल्यास पोट खराब होणे,डोके दुखणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

अनेकांना कॉफी आणि चहा वारंवार पिण्याची सवय असते. ऊन्हाळ्यात कॅाफी आणि चहा पिण्याच्या सवयी मुळे  डिहाइड्रेशनचा त्रास होऊ शकतो.

ऊन्हाळ्यात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण देखील जास्त आहे. अल्कोहोलमुळे शरीराचे तापमान वाढते. यामुळे डिहाइड्रेशन होते. तसेच रोगप्रतिकार शक्ती कमकूवत होते.

ऊन्हाळ्यात तेलकट पदार्थही खाल्ले जातात. घराघरात बनवले जातात. पण त्यामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता निमार्ण होते. ज्यामुळे तोंड येणे, चेहऱ्यावर पुरळ येणे तसेच रोगप्रतिकार शक्ती कमी होते.


हे ही वाचा- सावधान! डबाबंद पदार्थ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती होतेय कमी

First Published on: April 1, 2021 12:04 PM
Exit mobile version