वजन नियंत्रणात आणण्यासाठी प्या लिंबू पाणी.

वजन नियंत्रणात आणण्यासाठी प्या लिंबू पाणी.

Lemon Water

धावपळीच्या जीवनशैलीत स्वतः कडे लक्ष देण्यास अनेकांना वेळ नसतो. त्यामुळे पुरेसा योग्य आहार न घेतल्याने तब्येतीच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात जास्तीत जास्त फास्ट फूडचे सेवन केल्याने अधिक वाढणारे फॅट्स आणि वाढणार्‍या वजनाला तोंड द्यावे लागते. त्यासाठी नियमित सकाळी लिंबू पाणी सेवनाने होऊ शकतात हे फायदे.

*लिंबू पाणी खूप गुणकारी आणि आरोग्यवर्धक असल्याने लिंबामध्ये व्हिटॅमिन सी बरोबरच प्रोटिन्स कार्बोहायड्रेट, शर्कराही असते. त्यामुळे वजन कमी करण्यास आणि शरीरास फायदा होतो.

*लिंबू पाणी पितांना त्यात साखर मिक्स न करता घ्या. कमी कॅलरी असणारे हे पाणी शरीरास अधिक ऊर्जा देईल. नियमित सकाळी एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

*दिवसातून एक दोन वेळा लिंबू पाणी प्यायल्यास हरकत नाही. लिंबात असणार्‍या व्हिटॅमिन सी मुळे आपले आरोग्य चांगले राहते.

*सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी, लिंबू आणि मध एकत्र करुन घेतले तर वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. लिंबू पाणी अनावश्यक मात्रा शरीराबाहेर फेकण्यास मदत करते. त्यामुळे वाढलेलं वजन नियंत्रणात येण्यास मदत होते.

First Published on: January 31, 2019 5:23 AM
Exit mobile version