भर पावसात रस्त्यावरुन गाडी चालवताय? तर लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

भर पावसात रस्त्यावरुन गाडी चालवताय? तर लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

भर पावसात रस्त्यावरुन गाडी चालवताय? तर लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

पावसाळ्यात राइडला जाण्यात एक वेगळी मज्जा असते. अनेक जण राइडला जाण्यासाठी पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. पण पावसात राइड करणे वाटते तितके सोपे नसते. अनेक वेळा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. टू व्हिलर वरुन राइड करणारे गाडी कशीही बाहेर काढू शकतात. मात्र चार चाकी गाड्यांची पावसाळ्याच्या दिवसात मोठी कोंडी होते. पावसामुळेच आधीच अनेक ठिकाणी पाणी साचते, अनेक ठिकाणी रस्त्यांचे रुपांतर खड्यांमध्ये झाल्याचे पहायला मिळते आणि पावसाचे दिवस म्हटले की रस्त्यावर ट्रॅफिक आलाच. त्यामुळे पावसाळ्यात राइड करणे कटकटीचे कामही ठरु शकते. पावसाळ्यात गाडी चालवताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे भर पावसात गाडी चालवत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जाणून घ्या पावसाच्या दिवसातील काही सेफ्टी टिप्स (Driving on the road in heavy rain? So remember these important things)

गरज असल्यास घराबाहेर पडा

पावसाच्या दिवसात गरज असेल तर गाडी घेऊन घराबाहेर पडा. बाहेरील वातावरण पाहून राइडसाठी गाडी बाहेर काढा. खराब वातावरण असल्यास मुसळधार पावसामुळे गाडी खराब होण्याची शक्यता आहे.

खराब झालेले टायर बदला

पावसाच्या दिवसात गाडीचे खराब झालेले किंवा जास्त दिवस वापरेलेल टायर आठवणीने बदला. पावसाच्या दिवसात जुन्या टायरमुळे ग्रीप मिळण्यात अडथळा येतो.

ब्रेक सिस्टिम मजबूत करा

पावसाळ्यात गाडी बाहेर काढण्याआधी गाडीचे ब्रेक व्यवस्थित लागत आहेत का ते पहा. अनेक गाड्यांमध्ये फ्रंट आणि रियर अशा दोन्ही जागी डिस्क ब्रेक बसवलेले असतात जे पावसाळ्यात ओल्या जागी योग्य काम करतात. मात्र काही गाड्यांना असे ब्रेक नसतात. त्यांनी आपल्या गाडीचे ब्रेक चेक करुन नंतर गाडी बाहेर काढावी.

दोन गाड्यांमध्ये अंतर ठेवा

गाडी चालवणाऱ्याने गाडी चालवता चालवता समोर येणाऱ्या आणि बाजूने जाणाऱ्या गाड्यांमध्ये योग्य अंतर ठेवून गाडी चालवणे महत्त्वाचे आहे. गाड्यांमध्ये योग्य अंतर ठेवल्याने एखाद्या वेळी अपघात टाळता येतो.

रस्त्यावर चालणाऱ्यांकडे लक्ष द्या

पावसाच्या दिवसात गाडी चालवताना आपल्या सोबतच दुसऱ्यांचा देखील विचार करा. पावसाच्या दिवसात रस्त्यावर पाणी जमा होते. ते पाणी रस्त्यावर चालणाऱ्या लोकांच्या अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे गाडी सावकाश चालवणे कधीही उत्तम.


हेही वाचा – Sleeping Tips:सोफ्यावर झोपणे ठरु शकते धोकादायक,सोफ्यावर झोपणे म्हणजे आजारांना …

 

First Published on: June 22, 2021 3:43 PM
Exit mobile version