थंडीत वाढतो केसात कोंडा; अशी घ्या काळजी

थंडीत वाढतो केसात कोंडा; अशी घ्या काळजी

हिवाळ्यातील हंगामात केसांची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे असते. थंड हवामानात केस रुक्ष होऊ शकतात आणि कोंडा होण्याची समस्या देखील वाढू शकते. नंतर, ही समस्या केसांची मुळं कमकुवत करते आणि लहान वयातच केस गळण्याची समस्या निर्माण होते. हिवाळ्यामध्येही केस उत्तम आणि चमकदार राहण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया.

तेलाने केसाला मसाज करणं

आठवड्यातून एकदा गरम तेल किंवा बदामाच्या तेलाने डोक्याला मालिश करा. यामुळे डोक्यातील रक्त पुरवठा सुधारेल. तसेच केसांचा कोरडेपणा दूर होईल आणि हिवाळ्याच्या काळातही केस निरोगी राहतील.

हेअर ट्रिमिंग

हिवाळ्यातील हंगामात केस ट्रिम करणे देखील एक चांगला पर्याय आहे. हिवाळ्यातील वातावरणामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे केस तुटणे, गळणे अशा समस्या वाढण्याची शक्यता असते. ट्रिमिंग करून आपल्याला या समस्यांचा सामना करावा लागतो, त्यामुळे यावर ट्रिमिंग हा उत्तम पर्याय आहे.

रोज केस धुणं टाळा

टाळूची त्वचा मॉइश्चराइझ राहावी, यासाठी आपल्या केसांमधून नैसर्गिकरित्या तेलाचा स्त्राव होतो. याच कारणामुळे केस धुतल्यानंतर दोन ते तीन दिवसांनंतर तेलकट होतात. केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे तेल महत्त्वाची भूमिका निभावतात. नियमित हेअरवॉशमुळे केसांमधील नैसर्गिक ओलाव्यावर वाईट परिणाम होतो. केसांवरील नैसर्गिक चमक नाहीशी होऊ लागते. केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. यासाठी दररोज केस धुणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

केसांना स्कार्फने झाकून बाहेर

हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये केस शक्य तितके झाकून ठेवल्याने केसाचे आरोग्य उत्तम राहते. अन्यथा केस कोरडे होऊ शकतात. हिवाळ्यात केस ड्राय होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे बाहेर जातांना केसांना स्कार्फने झाकून बाहेर पडावे. हिवाळ्यात केसांना जास्त स्प्लिटस पडतात. त्यामुळे अधुन मधून केसांना ट्रीम करत राहा. म्हणजे केस हेल्दी राहतील.


करा ‘ही’ योगासने, रहा तणावापासून दूर
First Published on: December 27, 2020 3:33 PM
Exit mobile version