Parenting Tips : मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Parenting Tips : मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

आपल्या आयुष्यात आत्मविश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आत्मविश्वास असलेला माणूस कोणत्याही
संकटांचा सहज सामना करु शकतो. पण आत्मविश्वास वाढण्याची प्रक्रिया लहानपणापासून सुरु होते. मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यात पालकांची महत्त्वाची भूमिका असते. (How To Boost Confidence In Your Children) मुलांचे पालन-पोषण करताना त्यांच्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार पालकांनी करायला हवा. साधारणपणे मूल 5 वर्षांचे होईपर्यंत त्याच्यात सकारात्मक किंवा नकारात्मक विचार तयार व्हायला सुरुवात होते. चला जाणून घेऊया त्या प्रभावी टिप्स, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांमध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण करु शकता.

मुलांना वेळ द्या

मुले आई- बाबांच्या सहवासात जास्त मोकळेपणाने वागतात. त्यासाठी मुलांना पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. त्यावेळी मुलांच्या आवडी निवडी समजतात. आपल्या आवडीच्या गोष्टी मुलांना करायला मिळाल्या तर मुले आनंदाने, मोकळेपणाने कामे करतात. आई- वडिलांचा गुणात्मक वेळ मुलांना मिळाला तरच मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.

मुलांना हार स्विकारण्यास शिकवा

मुलांना लहान वयापासूनच अशी भिती असते की, जर त्यांनी काही करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ते योग्य प्रकारे जमले नाही तर लोक त्यांच्यावर हसतील आणि लोक त्यांचे मस्करी उडवतील. तुम्ही स्वत: मुलांची मस्करी करणे टाळा, मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना लाज वाटेल अशा गोष्टींपासून दूर ठेवा.

मुलांवर प्रेम करा

तुमचा रागीट टोन आणि बोलण्यासाठी वापरली जाणारी भाषा यामुळे मुलाला अस्वस्थ वाटू शकते. अशा परिस्थितीत तुमच्या मुलांसाठी वेळ काढा आणि त्यांच्याशी प्रेमाने बोला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यांचे शब्द आवडीने ऐका. यामुळे मुले नेहमी आत्मविश्वासू राहतील.

नकारात्मक विचारांपासून दूर राहा

मुले नकळत त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातून खूप काही शिकतात. अशा परिस्थितीत मुलांना नकारात्मक वातावरणापासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी बनते. तसेच त्यांच्यासमोर कधीही नकारार्थी शब्द वापरू नका, तुम्हाला जमणार नाही, तुम्ही पडाल, तुम्हाला दुखापत होईल इत्यादी. असे केल्याने मुलावर नकारात्मक परिणाम होतो.

मुलांनी चुका केल्यावर काय करावे 

लहान मुलांकडून कोणतेही काम करताना चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळे परिणामाऐवजी प्रक्रियेवर लक्ष देणे आवश्यक आहे. जर मुलाने एखादे काम व्यवस्थित पद्धतीने पूर्ण केले तर त्याचे कौतुक करा. कामात चूक झाली तर न ओरडता त्याला चूक काय झाली, ते समजावून सांगा. त्याची चूक कशी सुधारता येईल, ते त्याला सांगा. प्रत्येक कामाची योग्य पद्धत त्याला सांगितल्याने भविष्यात त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. काही आव्हानात्मक गोष्टींचा त्याला सामोरे जाऊ द्या. त्यासाठी त्याला मार्गदर्शन करा. ओव्हर प्रोटेक्टिव्ह राहू नका.

मुलांसमोर आदर्श निर्माण करा

लहान मुले आपल्या आई-वडीलांकडून शिकत असतात. पालक मुलांचे मोठे शिक्षक असतात. मुलांसमोर आदर्श निर्माण करा. तुम्ही प्रत्येक गोष्ट आत्मविश्वासाने करा. मुलाला आत्मविश्वास असलेला माणूस कसा असतो, हे समजेल. तुम्ही नकारात्मक वातावरणात मुलाला वाढवले तर त्याच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात.

हेही वाचा : नात्यातील खरेपणा ओळखण्यासाठी या गोष्टी करा

____________________________________________________________________

Edited By : nikita Shinde

First Published on: April 29, 2024 2:27 PM
Exit mobile version