पालकांनो मुलांसोबत अधिक कठोर वागणे टाळा

पालकांनो मुलांसोबत अधिक कठोर वागणे टाळा

मुलांचे पालनपोषण करणे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. आई-वडीलांना वाटते की, ते उत्तम संस्कारी, जबाबदार आणि यशस्वी नागरिक व्हावे. यामुळे पालक त्यांना शिस्त शिकवण्यासाठी त्यांच्यासोबत कठोरपणे वागतात. पालकांना असे वाटते की, यामुळे मुलांना शिस्त लागेल आणि ते दुसऱ्यांशी उत्तम वागतील. परंतु काही अभ्यासातून असे समोर आले आहे की, मुलांसोबत कठोर वागल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.

कठोर पालन-पोषणाऐवजी आई-वडिलांनी आपल्या मुलांसोबत प्रेम आणि सन्मानासह वागावे. मुलांना समजवावे काय चुक आणि काय बरोबर. मुलांच्या उत्तम कामांचे पालकांनी कौतुक केले पाहिजे. त्यांना त्यांच्या चुकांपासून कसे शिकावे हे सांगावे. अशातच मुलांसोबत अधिक कठोर वागल्याने कोणते नुकसान होऊ शकते हे पाहूयात.

– मुलांमध्ये भीती आणि चिंतेची भावना निर्माण होऊ शकते
-मुलांमधील आत्मविश्वास कमी होऊ शकतो
-मुलांमध्ये रागाची भावना निर्माण होऊ शकते
-मुलांमध्ये मानसिक आरोग्यासंबंधित समस्या येऊ शकते
-मुलांसोबत सक्तीने वागण्याऐवजी पालकांनी प्रेम आणि सन्मानासह रहावे. त्यांना चुक-बरोबर यामधील फरक सांगावा.
-मुलांना त्यांच्या कामांसाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यांच्या चुकांबद्दल ओरडण्याऐवजी समजावून सांगितले पाहिजे.

याव्यतिरिक्त पालकांनी मुलांसोबत कठोरपणे वागताना काही गोष्टींची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. जसे की, मुलांसोबत नेहमीच संवाद असावा, त्यांच्या भावना-विचार समजून घेतले पाहिजे. मुलांना चुकांमधून शिकण्याची संधी द्यावी आणि त्यांच्या कामाचे कौतुक करावे.


हेही वाचा- मुलं अभ्यासाचा कंटाळा करताहेत, मग वापरा ‘या’ ट्रिक्स

First Published on: October 28, 2023 12:35 PM
Exit mobile version