Sunday, April 28, 2024
घरमानिनीRelationshipमुलं अभ्यासाचा कंटाळा करताहेत, मग वापरा 'या' ट्रिक्स

मुलं अभ्यासाचा कंटाळा करताहेत, मग वापरा ‘या’ ट्रिक्स

Subscribe

सर्व पालक, खासकरून भारतीय पालक आपल्या मुलांच्या अभ्यासामुळे अधिक चिंतेत असतात. काही मुलं स्वत:हून अभ्यास करण्यास मागत नाही. अशातच बदलत्या वेळेनुसार पालकांच्या मुलांकडूनही काही अपेक्षा वाढल्या जातात. पण मुलं जर अभ्यासच करत नसेल तर पालकांचा अपेक्षाभंग होतो. त्यामुळे अभ्यापासून जर मुलं पळ काढत असेल तर पुढील काही टिप्स जरुर तुमच्या कामी येऊ शकतात.

-घरात आनंदाचे वातावरण निर्माण करा
जर मुलाने अभ्यास करावा असे वाटत असेल तर घरात खेळीमेळीचे वातावरण असले पाहिजे. त्याच्या अभ्यासासाठी शांतता असावी. मुलं जर अभ्यास करत असेल तर त्याला सतत एखाद्या कारणावरून अडवू नये. यामुळे मुलं अभ्यासापासून पळ काढू शकतो. त्याच्या अभ्यासाची एक जागा फिक्स करा.

- Advertisement -

-कौतुक करणे गरजेचे
मुलांना त्यांनी केलेल्या लहान-लहान गोष्टीवरुन कौतुक केले पाहिजे. गरजेचे नाही की, त्यांना उत्तम गुण मिळाल्यानंतरच कौतुक करावे. जर एखादे क्रिएटिव्ह काम त्याने केले तरीही त्याचे कौतुक करा. मुलांच्या बदलत्या काळानुसार सवयीही बदलल्या जातात. त्यामुळे त्यांना समजून घेत त्यांच्या आवडीनिवडी, छंद जोपासा.

-पुरेशी झोप गरजेची
काही वेळेस मुलं अभ्यास करतानाच झोपतात. पालकांना त्यावेळी असे वाटते की, अभ्यास करायचा नाही म्हणून तो कारणे देतोय. त्यामुळे मुलाची पुरेशी झोप होतेय की नाही याकडे जरूर लक्ष द्या.

- Advertisement -

-योगा आणि डाएटची काळजी घ्या
आपल्या मुलांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे. घरचे हेल्दी जेवण त्याच्या मानसिक आणि शारीरिक हेल्थसाठी फायदेशीर ठरेल . त्याचसोबत त्यांच्याकडून हलकी एक्सरसाइज किंवा योगा करून घेतल्यास त्यांची स्मरणशक्ती सुधारली जाईल. यामुळे अभ्यासात त्याचे मन लागेल.


हेही वाचा- मुलींचे भविष्य दडलंय त्यांच्या आरोग्यात, अशी घ्या काळजी

- Advertisment -

Manini