Fashion Tips: लग्नसोहळा असो किंवा पार्टी ‘या’ चार साड्यांनी तयार करा तुमचा क्लासी लुक

Fashion Tips: लग्नसोहळा असो किंवा पार्टी ‘या’ चार साड्यांनी तयार करा तुमचा क्लासी लुक

Fashion Tips: लग्नसोहळा असो किंवा पार्टी 'या' चार साड्यांनी तयार करा तुमचा क्लासी लुक

सध्या सणांचे दिवस सुरू आहेत. लवकरच लग्नाचे मुहूर्त देखील जवळ येतील. या दिवसात महिलांचा नटण्याथटण्याकडे विशेष कल पहायला मिळतो. लग्न सोहळा असो किंवा पार्टी स्रिया प्रामुख्याने साड्या नेसण्याला प्राधान्य देताना दिसतात. लग्न सोहळ्यात विशेषत: स्रिया साड्या खरेदी करताना सर्वापेक्षा वेगळं कसं दिसता येईल याकडे लक्ष देत असतात. चार चौघींत आपण कशा उठून दिसू आणि चार लोक आपलंच कौतुक करतील असा पद्धतीने स्रिया साड्या खरेदी करतात. साड्या हा भारतीय महिलांचा पारंपरिक पोशाख आहे. ज्यात स्रीचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. मात्र काळाच्या ओघात स्रियांच्या साड्या परिधान करण्याच्या पद्धती बदल्याचे पहायला मिळते. अनेक वेळा इंडोवेस्टन साड्यांकडे स्रियांचा विशेष कल असलेला पहायला मिळतो. तर अनेक महिलांना कोणती साडी घ्यायची आणि विशेष म्हणजे लग्न सोहळ्यात आणि पार्ट्यांमध्ये साड्या कशा कॅरी करायच्या असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. सध्या आलेल्या क्लासी आणि ट्रेंडी साड्या बाजारात उपलब्ध आहेत. लग्नसोहळा असो किंवा पार्टी ‘या’ चार साड्यांनी तयार करा तुमचा क्लासी लुक.

 

सिल्क साडी

तुम्हाला जर वाटत असेल की चार चौघात लोकांनी तुमचे कौतुक करावे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला एक स्टायलिश लुक देखील हवा आहे तर लग्न किंवा पार्ट्यांमध्ये तुम्ही सिल्कच्या साड्या नेसू शकता. सिल्कच्या साड्यांसोबत ट्रेंडी ब्लाउज घालून साडीचा लुक आणखी हटके करू शकता.

रफल साडी

लग्न आणि पार्ट्यांमध्ये रफल साड्या नेसणे कधीही उत्तम. रफल साडीमध्ये डार्क आणि प्लेन कलरच्या साड्यांची निवड करू शकता. यामुळे तुम्हाला ग्लॅमरस लुक मिळू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही साडीवर मॅचिंग ब्लॉउज देखील कॅरी करू शकता.

सिक्विन साडी

लग्नात तुम्हाला सिक्विन साड्यांचा ऑप्शन देखील आहे. सिक्विन साड्यांमध्ये प्रामुख्याने लाईट रंगांची निवड करा. त्याचप्रमाणे सिक्विन साड्यांमध्ये अशा साड्या खरेदी करा ज्यात जास्त वर्क केलेल नसेल. अशा साड्या तुम्ही लग्न किंवा पार्ट्यांमध्ये नेसू शकता.

ऑर्गेंजा साडी

ऑर्गेंजा साडीवर असलेल्या फ्लोरल प्रिंट तुम्हाला ट्रेंडी लुक देण्यासाठी मदत करतात. यात तुम्हाला फार उत्तम रंग देखील मिळू शकतात जे तुमचा लुक आणखी खुलून आणतात. या साड्यांसोबत तुम्ही ऑफ शोल्डर आणि हॉल्टर सारखे ब्लॉउज घालू शकता.


हेही वाचा – winter health tips: हिवाळ्यात आजारांपासून बचावासाठी डाएटमध्ये करा ‘या’ ५ पदार्थांचा समावेश

First Published on: November 10, 2021 3:57 PM
Exit mobile version