उपवास रेसिपी : रताळ्याची कचोरी

उपवास रेसिपी : रताळ्याची कचोरी

रताळ्याची कचोरी

नवरात्र उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी पाहायला मिळत आहेअनेक ठिकाणी गरब्याची तयारी केली जात आहेतर बरीच मंडळी उपवासाकरता रेसिपी शोधत आहेतअशीच एक चविष्ट अशी उपवासाची रेसिपी तुमच्यासाठी आणली आहेती म्हणजे रताळ्याची कचोरी.

सारणाचे साहित्य 

कचोरीच्या कव्हरसाठीचे साहित्य 

कृती

सर्वप्रथम रताळी आणि बटाटे उकडून घ्यावेत. त्यानंतर कुस्करून बारीक करावे. त्यात थोडे मीठ घालावे. अर्धा चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात १ वाटी चिरलेली कोथिंबीर, १ वाटी खवलेले खोबरे, ५ हिरव्या मिरच्या, ५० ग्रॅम बेदाणा, चिमूटभर मीठ आणि चवीनुसार साखर सर्व वस्तू घालून सारण तयार करावे. त्यानंतर रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्‍या तयार कराव्यात. त्यानंतर त्या कचोऱ्या वरीच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात आणि गरमगरम खायला द्याव्यात.

First Published on: September 29, 2019 6:00 AM
Exit mobile version