Fatty Liver | कढीपत्ता ठरतोय ‘फॅटी लिव्हर’वर गुणकारी ; जाणून घ्या फायदे

Fatty Liver | कढीपत्ता ठरतोय ‘फॅटी लिव्हर’वर गुणकारी ; जाणून घ्या फायदे

Fatty Liver | कढीपत्ता ठरतोय फॅटी लिव्हरवर गुणकारी ; जाणून घ्या फायदे

मानवी शरीरातील कोणत्याही अवयवाचे कार्य व्यवस्थितरित्या चालणे हे गरजेचे असते. यकृत हे शरीरातील महत्त्वाचं अवयव आहे.याच शरीरातील उपयुक्त अवयवाला फॅटी लिव्हर सारखे आजार होऊन यकृताची हानी होते. फॅटी लिव्हरचा जास्त धोका हा तरुणांमध्ये पाहायला मिळतो.चुकीची आहारपद्धती आणि धावपळीची लाइउस्टाइल यामुळे युवकांमध्ये या फॅटी लिव्हरचा त्रास पाहायला मिळतो. लीव्हरमध्ये जास्त चरबी जमा झाल्यामुळे लीव्हरला धोका पोहचतो.डॉक्टर फॅटी लिव्हरला किंवा त्यापासून होणाऱ्या धोक्याला सायलेंट किलर असे म्हणतात.तळलेले पदार्थ खाणे,व्यायाम न करणे आणि आहारात कोणतीही खबरदारी न घेतल्यास फॅटी लिव्हरचा धोका उद्भवतो. लिव्हर निरोगी राहण्यासाठी आपले लाइफस्टाइल सुधारणे आणि अल्कोहोल टाळणे हा उपाय आहे. फॅटी लिव्हरमध्ये अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असे दोन प्रकार आहेत.हा आजार सामान्यतः जीवनशैलीमुळे होतो. पण जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल केले तर फॅटी लिव्हरच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

लक्षणे

गुणकारी कडीपत्ता 

 

आपल्या रोजच्या जीवनात तडका देणारा कडीपत्ता हा या फॅटी लिव्हरवर गुणकारी ठरतो. कडीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी हे खूप जास्त प्रमाणात आहे. यासाठी कमजोर लिव्हर असणाऱ्या व्यक्तींमध्ये कडीपत्ता खूप फायदेशीर ठरतो. याशिवाय कडीपत्त्यामध्ये एंटीऑक्सीडंट आणि एंटी फंगल तसेच, एंटी-बॅक्टेरीयल गुणांचा समावेश असतो.जे गुण फॅटी लिव्हरपासून सुटका मिळवण्यास मदत करतात.यासोबतच यामध्ये असलेले इतर पोषक घटक आपल्याला फॅटी लिव्हरशी संबंधित असलेल्या सर्व समस्या दूर करण्यात मदत करतात.

याशिवाय फॅटी लिव्हर असलेल्या रुग्णांनी  लिंबू, द्राक्ष, संत्री यांसारखी ‘जीवनसत्त्व सी’ असलेली फळे खावीत. याशिवाय तुमच्या आहारात एवोकॅडो आणि अक्रोडाचा समावेश करून तुम्ही यकृताला आजारांपासून वाचवू शकता. एवोकॅडो आणि अक्रोड यकृतामध्ये जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकतात.


हे ही वाचा – Winter Health care : हिवाळ्यात ‘या’ पदार्थांचे करा उपाशीपोटी सेवन ; वाचा आरोग्यदायी फायदे


 

 

First Published on: December 10, 2021 12:53 PM
Exit mobile version