महिलांनो आर्थिक सेफ्टीसुद्धा महत्त्वाची

महिलांनो आर्थिक सेफ्टीसुद्धा महत्त्वाची

घरातील महिलांकडे संपूर्ण महिन्याभराच्या खर्चाचे बजेट असते. त्यामुळे आपल्याला महिन्याभरात किती खर्च होतो याची लिस्ट तयार करते. परंतु बहुतांश महिला या स्वत:साठी फार कमी खर्च करतात आणि परिवाराच्या आनंदासाठी अधिक खर्च करताना दिसतात. त्यामुळे तुम्हाला घरात कितीही मोकळीक असली तरीही स्वत:साठी बचत प्रत्येक महिलेने केली पाहिजे. त्यावेळी नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे पाहूयात.

स्वत:वर विश्वास ठेवून उत्तम पर्याय निवडा


महिला बचत करण्यास तरबेज असतात. अशातच त्यांनी कधीच विचार करू नये की, त्या चुकीच्या ठिकाणी तर गुंतवणूक करणार नाहीत. त्यामुळे स्वत:वर आत्मविश्वास ठेवा. त्यानंतर तुम्ही असे एक माध्यम निवडा जे गुंतवणूकीसाठी अगदी सुरक्षित आहे.

सोन्यात गुंतवणूक करा


सोनं हे प्रत्येक महिलेला आवडते. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्यामधून उत्तम रिटर्न्स मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी घाबरत असाल तर गोल्ड बॉन्डचा पर्याय निवडू शकता.

आपत्कालीन फंड नेहमीच ठेवा सोबत


आपत्कालीन स्थितीत घरातील महिलाच मदत करतात. अशातच तुम्ही महिन्याभराच्या खर्चातून थोडे पैसे बचत करा. यामधूनच तुमचा आपत्कालीन फंड तयार होईल.


हेही वाचा- मैत्रिणींनो असे बनवा महिन्याचे बजेट

First Published on: July 6, 2023 5:06 PM
Exit mobile version