घरलाईफस्टाईलमैत्रिणींनो असे बनवा महिन्याचे बजेट

मैत्रिणींनो असे बनवा महिन्याचे बजेट

Subscribe

तुमचे सुद्धा महिन्याभराचे बजेट बिघडले जाते का? खासकरुन जेव्हा पगार हातात येतो त्याच्या दोन आठवड्यापर्यंत स्थिती व्यवस्थितीत असते. मात्र अखेरच्या आठवड्यात समस्या येऊ लागतात. त्यामुळे महिन्याभराचे बजेट कसे तयार कराल याच संदर्भातील काही टीप्स तुमच्या कामी येऊ शकतात.

-महिन्याच्या सुरुवातीला किती पैसे आहेत?
आर्थिक आत्मनिर्भर बनण्यासाठी महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वात प्रथम तुमच्या बँक खात्यातील बॅलेन्स तपासून पहा. यामुळे तुम्हाला कल्पना येईल की, तुमच्याकडे किती पैसे शिल्लक राहिले आहेत. आपल्या बेसिक गरजा पूर्ण होतील ऐवढे पैसे असतील खात्यात असू द्या.

- Advertisement -

मोठ्या खर्चांची लिस्ट काढा
तुमच्याकडे महिन्याभराच्या खर्चासाठी किती पैसे आहेत हे तुम्हाला कळल्यानंतर महिन्यात किती खर्च आहेत याची लिस्ट काढा. यामध्ये आधी तुमच्या मोठ्या खर्चांची लिस्ट काढा. त्यामुळे तुमच्या हातात किती पैसे शिल्लक राहतायत हे कळेल.

गुंतवणूक करण्यास विसरु नका
तुमच्या महत्वाच्या कामांच्या सुचीमध्ये गुंतवणूक हा पर्याय ठेवाच. तुमच्या पगारातून खर्चाची लिस्ट काढाच पण त्याचसोबत गुंतवणूकीकडे सुद्धा लक्ष द्या.जेणेकरुन वायफळ खर्च यामुळे कमी होतील.

- Advertisement -

उधारी चुकती करा
सध्याच्या जगात सर्वाधिक सोप्पी गोष्ट म्हणजे उधार घेणे. क्रेडिट कार्डचा खर्च असो किंवा एखाद्याकडून मागितली गेलेली रक्कम ही वेळीच परतफेड केली पाहिजे. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्ही कर्जांची परतफेड करण्यासाठीचे पैसे बाजूला काढून ठेवा.


हेही वाचा- Time Management म्हणजे यशाची गुरुकिल्ली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -