Foot care in monsoon: पावसाळ्यात पायांची अशी घ्या काळजी

Foot care in monsoon: पावसाळ्यात पायांची अशी घ्या काळजी

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्याचसोबत त्वचेसंबंधित काही समस्या उद्भवतात. सर्वाधिक समस्या ही पायांच्या त्वचेसंबंधित होते. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी जमा होते आणि त्याच पाण्यातून आपण चालत असतो. अशातच या पाण्याच्या माध्यमातून फंगल इंफेक्शन होण्याची शक्यता असते. इंफेक्शन पायांच्या त्वचेला नुकसान पोहचवू शकते. पावसाळ्यात पायांची कशी काळजी घ्यावी याच संदर्भात खास टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Foot care in monsoon)

घरी आल्यानंतर पाय स्वच्छ धुवा
जर तुम्ही संपूर्ण दिवसभर घराबाहेर राहत असाल तर सर्वात प्रथम तुम्ही तुमचे मोजे-बुट सुकण्यासाठी ठेवा. पावसाळ्यात पायांमध्ये ओलावा राहिल्यास तर फंगल इंफेक्शन होऊ शकते. संक्रमणापासून दूर राहण्यासाठी पाय हॉट वॉटर टबमध्ये थोडावेळ ठेवून स्वच्छ धुवा. त्यानंतर पाय टॉवेलने पुसून घ्या.

त्वचा एक्सफोलिएट जरुर करा
पावसाळ्यात पायांना फंगल इंन्फेक्शनपासून दूर ठेवण्यासाठी एक्सफोलिएट करणे गरजेचे आहे. यामुळे पायांच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. त्याचसोबत पायाचे तळवे मऊ सुद्धा राहतात. पायांजवळ स्क्रब करण्यासाठी नारळ किंवा ऑलिव्ह ऑइलच्या तेलात थोडीशी साखर मिक्स करुन स्क्रब करा. यामुळे डेड स्किन सेल्स निघून जातील.

ओलसर बूट घालू नका
जर तुमची सँन्डल किंवा बूट पावसाळ्यात ओलसर झाल्यास ते व्यवस्थितीत सुकवा. ओलसर बूट घालण्यापासून दूर रहा. यामुळे फंगल इंन्फेक्शन होऊ शकते.

रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवा
पावसाळ्यात रात्री नेहमीच पाय स्वच्छ धुवून झोपावे. जसे की, पायांना मॉइश्चराइजर लावावे. अथवा नारळाचे किंवा ऑलिव्ह तेल लावून मसाज करु शकता.

पावसाळ्यात नखं कापा
या ऋतूत हाता-पायांची नखं कापा. कारण यामध्ये घाण अडकल्यास पोटासंबंधित विकार होऊ शकतात. पावसाळ्यात आठवड्यातून दोनदा तरी नखं कापा आणि ती स्वच्छ ठेवा.


हेही वाचा- Monsoon : पावसाळ्यात केस गळतात? ‘या’ टिप्स करा फॉलो

First Published on: June 29, 2023 11:45 AM
Exit mobile version