आयुष्यात मित्रपरिवार हवाच, पण…

आयुष्यात मित्रपरिवार हवाच, पण…

आयुष्यात मित्र किती महत्लाचे असतात यावर फारसा विचार केला जात नाही. परंतु नुकत्याच लॉन्च झालेल्या एका पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की, अधिक मित्र असणे उत्तम नव्हे. सोशल मीडियाच्या या काळात सध्या मित्रपरिवार ऐवढा विस्तारला जातो की त्यांची संख्या किती असेल हे मोजणेच कठीण असेल. अशातच ब्रिटेन मधील प्रसिद्ध लेखक आणि रिलेशनशिप तज्ञ एलिजाबेथ डे या अशा म्हणतात की, खुप मित्रांना आपल्या जवळ केल्यानंतर तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. लोक तुम्हाला फारसे महत्व देऊ इच्छित नाहीत.

आपले नवे पुस्तर फ्रेंडलॉकिलमध्ये एलिजाबेथ हिने असे म्हटले आहे की, उत्तम मानसिक आरोग्यासाठी चार-पाचच मित्र पुरेसे आहेत. यापेक्षा अधिक असतील तर फायदा कमी किंवा होतच नाही.

खरंतर लॉकडाउनमध्ये दीर्घकाळ बहुतांश लोकांनी एकटेपणाचा अनुभव केला. त्या अशा म्हणतात की, मी यादरम्यान खुप मित्र बनवले. पण सर्वांसोबत संपर्क करणे शक्य नव्हते. बहुतांश जणांना मी ओळखत सुद्धा नव्हती. काही वाईट मित्र सुद्धा या दरम्यान मिळाले.एलिजाबेथ असे म्हणतात की, तुम्ही ज्या लोकांसाठी सर्वकाही सोडून देता, त्यांचे कधीही फोन आले की घेता, ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास असतो अशी माणसं फार कमी असतात. सर्वचजण तुमचे निकटवर्तीय नसतात.

बहुतांश वेळा गर्भपाताचा सामना केलेल्या एलिजाबेथ यांनी असे ही म्हटले की, अशा वाईट प्रसंगी तुमच्यासोबत किती जण उभे राहतात हे खरं दिसून येते. मी भाग्यवान आहे की मला असे मित्र मिळाले. त्यापैकी सर्वाधिक उत्तम मित्र एम्मा हिचा सुद्धा उल्लेख केला.

एलिजाबेथ असे ही म्हणते की, बहुतांश लोकांना हे सु्द्धा कळत नाही फ्रेंड सर्कल मोठा असणे हे सामाजिक संपर्कात मोठी बाधा आहे. कारण लोक असे मानतात की, तुम्ही मैत्रीची जबाबदारी निभावण्यासाठी कमी सक्षम आहेत. जर्नल पर्सनालिटी अॅन्ड सोशल सायकॉलोजीच्या अभ्यासानुसार लोकांना त्या लोकांशी जोडले जाणे आवडते ज्यांचा मित्रपरिवार कमी असतो.या तथ्याने हे खरं करुन दाखवले आहे की, तुमचा सर्कल मोठा असेल तर अधिक लोक तुमच्याशी मैत्री करु पाहतीलच असे नाही.

 


हेही वाचा: लिव्ह इन् रिलेशनशिपचे फायदे आणि तोटे

First Published on: April 19, 2023 3:59 PM
Exit mobile version