मुलींनो वाईट दादा,काका,मामा आणि आजोबांना कसे ओळखाल

मुलींनो वाईट दादा,काका,मामा आणि आजोबांना कसे ओळखाल

बदलत्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येकाची जीवशैली ही दिवसागणित बदलत चालली आहे. त्याचसोबत लोकांची मानसिकता ही बदलली आहे. अलीकडल्या काळात महिलांसोबतच्या गुन्ह्यांचे प्रकार फार वाढले आहेत. त्यामुळे काही पालक आपल्या मुलींना एखाद्या ठिकाणी एकटे पाठवताना सुद्धा आजही विचार करतात. कारण अल्पवयीन मुलींना कोण कोणत्या उद्देशाने आपल्याशी बोलतोय, वागतोय किंवा स्पर्श करतोय हे लगेच कळत नाही. अशातच दादा, काका, मामाच्या नात्याने काहीजण मुलींजवळ येतात. त्यांना सुरुवातीला आपुलकीच्या भावनेने बोलतात पण हळूहळू त्यांचे वागणे बदलले जाते. त्यामुळे मुलींनो गुड टच आणि बॅड टच कसा ओळखाल हे जाणून घेऊयात.

सध्याच्या मुलींनी गुड टच आणि बॅड टच म्हणजे नक्की काय हे समजून घेतले पाहिजे. कारण हा एक गंभीर विषय आहे. खरंतर काही पालक या बद्दल आपल्या मुलीला सांगत ननाही. अशातच त्यांचा एखादा व्यक्ती गैरफायदा घेऊ शकतो.

मुलींनो बॅड टच हा नेहमीच तुम्हाला अनकंम्फर्टेबल वाटतो. समोरच्या व्यक्तीने केलेला स्पर्श हा वाईट उद्देशाने असल्याचे लगेच कळते. जर एखादा अज्ञात व्यक्ती तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सला चुकीच्या पद्धतीने हात लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला बॅड टच म्हणतात.

मुलींना गुड टच आणि बॅड टच बद्दल कसे सतर्क रहाल?
-गुड टच वेळी तुम्हाला स्वत: ला सुरक्षित असल्याचे जाणवते. अशा प्रकारच्या स्पर्शावेळी तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे तुमच्यावरील प्रेम दिसते. तो स्पर्श झाल्यानंतर तुम्ही आनंदीत होता. जसे की, आईने तुम्हाला मिठी मारली असं.

-पण बॅड टचवेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीसमोर घाबरलेले दिसता. तुम्हाला कळत नाही नक्की काय करावे. पण अशावेळी तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला याबद्दल सांगा. कारण काहीवेळेस काका, दादा, आजोबाच्या नात्याने तुम्हाला त्यांच्या भावनांमध्ये अडकवून चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतात.

खरंतर सध्याच्या प्रत्येक मुलींनी या बद्दल सतर्क झाले पाहिजे. आजच्या काळात मुलींसोबत लैंगिक शोषण अथवा छेडछाडच्या घटना वाढत चालल्या आहेत. या मागील सर्वाधिक मोठे कारण असे की, लैंगिक शोषणाबद्दलची जागृकतेची कमतरता. त्यामुळे मुलींनो तुम्हाला जरी एखाद्याने तुमच्याशी सुरुवातीला प्रेमाने वागून नंतर तुम्हाला वाईट पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल तर गप्प बसू नका. याबद्दल बोला.


हेही वाचा- प्रत्येक महिलेला माहीत असाव्यात ‘या’ 5 गुप्त गोष्टी

First Published on: May 4, 2023 12:14 PM
Exit mobile version