सोने खरेदी करताना काय काळजी घ्याल

सोने खरेदी करताना काय काळजी घ्याल

सोनं घालणे महिलांना फार आवडते जरी ते खुप महाग असले तरीही. त्यामुळे आपण नेहमीच पाहतो की, ज्वेलरीच्या दुकानात महिलांची अधिक गर्दी असते. अशातच तुम्ही सुद्धा सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

सोन्याची शुद्धता


सोनं खरेदी करताना नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवा की, ते शुद्ध असावे. सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. भारतात सोनं हे हॉलमार्क वरून ओळखले जाते. त्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर त्याच्या कॅरेट बद्दल जरुर माहिती घ्या.

किंमतीकडे विशेष लक्ष द्या


सोन्याच्या किंमतीत दररोज बदल होत असतात. अशातच तुम्ही जेव्हा सोनं खरेदी करणार असाल तेव्हा सोन्याची मार्केटमध्ये किंमती किती सुरुयं हे पहा. त्याचसोबत एका आठवड्यांपूर्वी त्याच्या किंमती किती होत्या हे सुद्धा तपासून घ्या.

ज्वेलरीवर हॉलमार्क गरजेचा


सोन्याची शुद्धता तपासून पाहण्यासाठी हॉलमार्क ज्वेलरीवर असावा. जर ज्वेलरीवर हॉलमार्क नसेल तर ज्वेलरी खरेदी करू नका. हॉलमार्क नसलेले दागिने खरेदी केल्यास समस्या उद्भवू शकते.

बिल जरुर घ्या


सोनं खरेदी केल्यानंतर बिल जरुर घ्या. त्याचसोबत हे लक्षात ठेवा की, बिलावर मेकिंग चार्ज आणि गुड्स अॅन्ड सर्विस टॅक्स बद्दल संपूर्ण माहिती द्या. अशातच सोनं खरेदी केल्यानंतर पक्क बिल जरुर घ्या. कारण कच्च्या बिलावर कोणीही विश्वास ठेवत नाही.


हेही वाचा- Micro Wedding साठी असे करा प्लॅनिंग

First Published on: July 6, 2023 12:39 PM
Exit mobile version