घरलाईफस्टाईलMicro Wedding साठी असे करा प्लॅनिंग

Micro Wedding साठी असे करा प्लॅनिंग

Subscribe

लग्नाचे प्लॅनिंग करणे हे एका आव्हानात्मक कामासारखे असते. यामध्ये फार दमछाक ही होते. लग्नामध्ये केवळ खाणंपिणं नव्हे तर पाहुण्यांच्या स्वागतापर्यंत सर्व गोष्टींकडे पहावे लागते. याच दरम्यान काही फंक्शन सुद्धा आयोजित केले जातात. मात्र कोरोनाच्या काळानंतर सध्या मायक्रो वेडिंगचा ट्रेंन्ड फार वाढला आहे. खरंतर यामध्ये मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडला जातो. अशातच अधिक धावपळ, ताण नसतो. मात्र अशा वेडिंगचे प्लॅनिंग कसे करावे याबद्दल कंफ्युजन सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला मायक्रो वेडिंगचे प्लॅनिंग कसे करावे याच संदर्भातील काही खास टीप्स सांगणार आहोत. (Micro wedding planning)

पाहुण्यांची लिस्ट तयार करा
मायक्रो वेडिंगचे प्लॅनिंग करताना सर्वात प्रथम पाहुण्यांची एक लिस्ट तयार करा. यामध्ये फार मोजक्याच लोकांना बोलावले जाते. अशातच सर्वात प्रथम किती पाहुणे येणार आहेत आणि कोण-कोण येणार आहेत त्यांची एक लिस्ट तयार करा. सुनिश्चित करा की 50 पेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित करू नये.

- Advertisement -

बजेट ठरवा
रिअलस्टिक बजेट ठरवा आणि त्यावर स्टिक रहा. यासाठी कपलला ठरवावे लागेल की, किती लोकांना तुम्ही बोलावणार आहात आणि वेन्यू काय असेल. त्याचसोबत हनिमूनसाठी किती पैसे बाजूला काढून ठेवले पाहिजेत. त्याचसोबत खाण्यापिण्यावर आणि वेन्यूवर अधिक खर्च करण्यापेक्षा त्या पैशांची बचत करा. मात्र हे कपलवर निर्धारित असते की, ते किती कमी बजेटमध्ये लग्न करू इच्छितात.

वेन्यूची निवड
मायक्रो वेडिंगसाठी तुम्ही एखादे सुंदर ठिकाण निवडा. पण तेथे आजूबाजूला अधिक गोंधळ नसेल हे सुद्धा पहा. तुम्ही तुमच्या आवडीच्या रेस्टॉरंट, कॅफे किंवा हॉलची निवड करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही घराच्या बॅकयार्डमध्ये सुद्धा याची व्यवस्था करू शकता.

- Advertisement -

फोटोग्राफर हायर करा
लग्न सोहळ्याच्या आठवणी जपुन ठेवण्यासाठी तुम्ही फोटोग्राफरला हायर करू शकता. साखरपुडा ते लग्नाचे सुंदर फोटो तुम्ही नक्कीच कॅमेऱ्यात कैद करा.

मर्यादित पदार्थ ठेवा
सर्वांनाच लग्नात चमचमीत पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे लग्नात नक्की कोणते पदार्थ असावेत हे ठरवा. अशातच मर्यादित पदार्थ तुमच्या मेन्यूसाठी आधीच विचार करा.


हेही वाचा- मॅट्रिमोनियल साईटवर जीवनसाथी शोधताना वापरा ‘या’ टिप्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -