येथे सफेद वस्त्रात नववधूची होते बिदाई

येथे सफेद वस्त्रात नववधूची होते बिदाई

जगभरात लग्नासंदर्भात प्रत्येकाचा रुढी-परंपरा या वेगवेगळ्या आहेत. अशातच लग्नात सफेद किंवा काळ्या रंगाचे कपडे घालणे अशुभ मानले जाते. त्यामुळे लाल रंगाच्या सुंदर साडीत नववधू तयार होते. कारण आपल्या हिंदू संस्कृतीत हा रंग सौभाग्याचा मानला जातो.

पण आपण जर बॉलिवूड मधील ट्रेंड पाहिल्यास तर आज सुद्धा लोक सफेद रंगाचा लहंगा घालताना दिसून येतात. मात्र आम्ही तुम्हाला अशा एका गावाबद्दल सांगणार आहोत जेथे लग्नानंतर नववधूला चक्का एका विधवेसारखे सासरी पाठवली जाते. ही सर्वात हैराण करणारी गोष्ट आहे. या व्यतिरिक्त घरातील मंडळी सुद्धा सफेद रंगाचे यावेळी कपडे घालतात.

खरंतर मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील भीमडोंगरी गावात मुलीच्या लग्नानंतर तिचे आई-वडिल तिला एका विधवेच्या रुपात सासरी पाठवणी करतात. असा प्रकार आदिवासी भागात केला जातो. हे त्यांच्या आयुष्य जगण्याचा एक भागच आहे. भीमडोंगरी गावात लग्नानंतर नववधू सफेद रंगाचे कपडे घालूनच घरातल्यांना विदाई देते.

मध्य प्रदेशातील भीमडोंगरी गावात राहणाऱ्या आदिवासी समजातील लोक गौंडी धर्माचे पालन करतात. या धर्माच्या नियमानुसार सफेद रंग हा शांतिचे प्रतीक मानला जातो. त्यामुळेच नवे आयुष्य सुरु करताना सफेद रंग हा त्यांच्यासाठी शुभ मानला जातो. या व्यतिरिक्त आणखी एक अनोखी प्रथा अशी की, येथे ४ फेरे हे मुलीच्या घरी आणि पुढील ३ फेरे ही मुलाच्या घरी घेतले जातात.

 


हे देखील वाचा: वाढत्या वयासह लग्नासाठी स्थळ येत नाहीये? करा हे उपाय

First Published on: April 17, 2023 11:58 AM
Exit mobile version