Health Care : उन्हाळ्यात हिरवे बदाम खाल्ल्याने हे होतात फायदे

Health Care : उन्हाळ्यात हिरवे बदाम खाल्ल्याने हे होतात फायदे

राज्यात तापमान सातत्याने वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे लोक खूप हैराण झाले आहेत. लोक एसीची हवा आणि गार पाणी पिऊन स्वत:चा बचाव करत आहेत. तर या वातावरणात प्रत्येकाने आपल्या रोज आहारात बदल केला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये कच्चे किंवा हिरवे बदाम (Green almonds) खाण्यासाठी डॉक्टर सांगत असतात. त्यामधील पोषक तत्त्वे उष्णतेवर मात करायला मदत करतात.

अनेक लोक रात्री बदाम भिजवून सकाळी ते खातात. त्याचप्रमाणे हिरवे बदामदेखील तेवढेच फायदेशीर आहे. उन्हाळ्यात हिरवे बदाम खल्लाचे खूप फायदे आहेत. तर चला जाणून घेऊ या काय आहेत फायदे.

1. उन्हाळ्यात हिरवे बदाम सातत्याने खल्लाने रोगप्रतिकारक क्षमता (Immunity) वाढवण्यासाठी मदत होते.

2. हिरव्या बदामामध्ये अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बॉडी डिटॉक्स होण्यासाठी मदत होते.

3. त्याचबरोबर शरीरातील पीएचचं प्रमाण सामान्य राहण्यास मदत होते.

4. आहारात हिरव्या बदामाचा सेवन केल्याने हार्टच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

5. हिरव्या बदामामध्ये फ्लेवोनोइड्स आणि बायोफ्लेवोनोइड्सचं यांचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीरातील अँटीऑक्सिडेंट आणि ब्लड सेल्सही वाढण्यास मदत होते.

6. हिरव्या बदाम खाल्याने कोलेस्ट्रॉल (Cholesterol) नियंत्रित राहते.

7. हिरवे बदाम खल्लाने शरीरातील मेटाबोलिजम वाढले जाते. त्यामुळे गॅस आणि अॅसिडीटी (Gas and acidity) सारख्या समस्या कमी होतात. बदामामध्ये फॉस्फोरसचे प्रमाण असल्याने शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते.

First Published on: April 5, 2022 6:13 PM
Exit mobile version