Sunday, May 12, 2024
घरमानिनीHealthहृदय, डोळे आणि हाडं मजबूत करण्यासाठी फरसबी आहे फायदेशीर

हृदय, डोळे आणि हाडं मजबूत करण्यासाठी फरसबी आहे फायदेशीर

Subscribe

शरीर नेहमी सुदृढ ठेवण्यासाठी डॉक्टर हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. हिरव्या भाज्या केवळ शरीर निरोगीच नाही तर अनेक गंभीर आजारांशी लढण्यासाठी देखील मदत करतात. भारतातीय लोक अनेक विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांचे सेवन करतात. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या विविध चवीच्या भाज्या आहेत. पण या सर्व भाज्यांमध्ये एकच भाजी अशी आहे जिचं नाव घेतल्यावरही अनेकजण नाक-तोंड मुरडतात.

अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेली फरसबी खाण्याचे अनेक फायदे आहेत. फरसबी खूप आरोग्यदायी आणि शक्तिवर्धक आहे. हृदयाला निरोगी ठेवण्यात मदत करतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप लाभदायी असते. मात्र, काहीजणांना ही आवडत नाही. परंतु याचे फायदे अनेक आहेत.

- Advertisement -

फरसबी खाण्याचे फायदे

Green Beans Nutrition: Health Information

  • हृदयरोगाचा धोका कमी होतो

फरसबीमध्ये फ्लेवोनॉइड्सचे प्रमाण खूप असते यामुळे हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो. फ्लेव्होनॉइड्स हे पॉलिफोनिक अँटिऑक्सिडेंट्स आहेत जे मुख्यत्वे करुन फळे आणि भाज्यांमध्ये आढळतात.

- Advertisement -
  • हाडांचे आरोग्य सुधारते

फरसबीमध्ये कॅल्शियम असते जे हाडांच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. कॅल्शियम व्यतिरिक्त हिरव्या शेंगामध्ये व्हिटॅमिन के, ए आणि सिलिकॉन असतात. या सर्व व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे हाडांची झीज होते. त्यामुळे हे व्हिटॅमिन आपल्या हाडांच्या आरोग्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात.

Garlic Green Beans Recipe – How to Cook Green Beans — Eatwell101

  • डोळ्याचे आरोग्य सुधारण्यास मदत

फरसबीमध्ये कॅरेटिनॉइड भरपूर प्रमाणात असतात. यामुळे डोळ्यांच्या आतील शिरांवर येणारा ताण कमी करण्यास मदत होते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर नक्कीच फरसबीचा आहारात नियमित वापर करा.

  • पचनाच्या समस्या सोडविण्यासाठी मदत

फरसबीमध्ये भरपूर तंतू म्हणजेच फायबर असतात. फायबरमुळे पचनाच्या अनेक समस्या दूर होतात. शेंगातील फायबर मूळव्याध आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतात. तसेच शेंगातील फायबर शरीरातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राखण्यास मदत करतात.

  • शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत

फरसबीच्या शेंगामध्ये मूत्र विसर्जनास मदत करणारा गुणधर्म असतो. त्यामुळे शरिरातील विषारी तसेच अनावश्यक घटकांना मूत्राद्वारे बाहेर काढण्यास मदत होते.


हेही वाचा : आठवड्यातून एकदा तरी खा कारले; आहेत जबरदस्त फायदे

- Advertisment -

Manini