हातसडीचा तांदूळ ठरतोय आरोग्यासाठी हितकारक ; मधुमेहींसाठीही उपयुक्त

हातसडीचा तांदूळ ठरतोय आरोग्यासाठी हितकारक ; मधुमेहींसाठीही उपयुक्त

हातसडीचा तांदूळ ठरतोय आरोग्यासाठी हितकारक ; मधुमेहींसाठीही उपयुक्त

हातसडीच्या तांदळाची सध्या जास्त प्रमाणात चर्चा सुरू असून, प्रत्येक जण हातसडीचा तांदूळ खाण्याचा सल्ला देतो. संशोधनाअंती सिद्ध झाले आहे की, पांढर्‍या किंवा पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ आरोग्यासाठी अधिक चांगला ठरतो. पांढर्‍या तांदळाचे रिफाइंड न केलेले रूप म्हणजे ब्राउन राईस किंवा हातसडीचा तांदूळ. हातसडीच्या तांदळावर ब्रान, जर्म आणि एंडोस्पर्म यांचा थर असतो. ब्रान आणि जर्ममध्ये प्रथिने, फायबर्स आणि लोह भरपूर प्रमाणात असते. एंडोस्पर्ममध्ये जास्त प्रमाणात कार्बोदके असतात. पण जेव्हा या तांदळाला पॉलिश केले जाते तेव्हा त्यातील ब्रान आणि जर्म ही दोन्ही आवरणे निघून जातात. त्यामुळे पांढर्‍या तांदळात केवळ कार्बोदके असल्याने हा तांदूळ आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतो.


हे ही पाहा – बघा, असा तयार होतो हातसडीचा तांदूळ 


 

मधुमेहींसाठी वरदान

कार्बोदकांबरोबरच प्रथिने, फायबर्स, अन्य पोषक घटक असतात. ज्यामुळे हातसडीचा तांदूळ पॉलिश केलेल्या तांदळाच्या तुलनेत अधिक सरस ठरतो. मधुमेहींसाठी खाण्यायोग्य ज्या पदार्थांची ग्लाइसेमिक लोड कमी असतो, ते रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित ठेवतात. म्हणूनच मधुमेहींनी या तांदळाचे सेवन केले तरी चितेचे कारण नाही. तसेच आरोग्यासाठी अधिक हितकारक ठरत आहे.

प्रथिने अधिक उपयुक्त

पॉलिश केलेल्या तांदळाच्या तुलनेत हातसडीच्या तांदळाची ग्लाईसेमिक इंडेक्स खूप कमी असते. म्हणून हा मधुमेहींसाठी खूप उपयुक्त ठरतो. लठ्ठ व्यक्तींनी खाल्ला तरी चिंता नाही. पांढर्‍याच्या तुलनेत हातसडीच्या तांदळात फायबर्स अधिक असतात.

फायबर्सचे प्रमाण अधिक

तांदळात फायबर्सचे प्रमाण जास्त असल्याने थोडा खाल्ला तरी समाधान मिळते आणि पोट भरते. म्हणून लठ्ठ व्यक्तीही कोणतीही चिंता न करता हातसडीच्या तांदूळ खाऊ शकतात. केलेल्या तांदळाच्या तुलनेत हातसडीच्या तांदळात अनेक प्रकारचे सुक्ष्म घटक म्हणजे झिंक, सेलेनियम यासारखे घटक भरपूर प्रमाणात असतात.हे सुक्ष्म घटक आपली रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यास सहाय्यक ठरतात.

                                                                                             वार्ताहर – रत्नाकर पाटील


हे ही वाचा – झटपट बेसन रवा इडली


 

First Published on: October 7, 2021 7:11 PM
Exit mobile version