आंबट चिंचेचे गोड फायदे

चिंच म्हटलं का स्त्रियांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र, ही चिंच फक्त स्त्रियांनाच आवडते असे नाही. शरीरासाठी उपयुक्त असणारे चिंच स्त्री किंवा पुरुष कुणीही खाल्ली तरी त्यांच्या शरीरास ती फायदेशीरच ठरते. चला तर बघूया आंबट चिंचेचे गोड फायदे.

भूक वाढते

पिकलेली चिंच खाल्ल्यास भूक वाढते.

पोटदुखी

चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित दिल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी थांबते.

जुलाब

एखाद्या व्यक्तीस रक्त आव किंवा जुलाब होत असल्यास चिंचोके पाण्यात वाटून देतात.

तोंड स्वच्छ होण्यास

बऱ्याचदा पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्याने भाजीत किंवा आमटीत वापरल्याने तोंड स्वच्छ होते.

शौचाला साफ होणे

सकाळी शौचाला साफ होत नसेल आणि मलावरोधाची सवय असेल तर एक किलो चांगली पिकलेली चिंच घ्यावी. ती दोन लीटर पाण्यात चार ते पाच तास भिजत ठेवावी. नंतर चिंच कुसकरुन ते पाणी गाळून घ्यावे. पाणी अर्धे आटवावे. त्यात दोन किलो साखर मिसळून पाक करुन घ्यावा. हे सरबत रोज रात्री थोडे थोडे प्यावे. आरोग्यदृष्ट्या फायदेशीर ठरेल.


हेही वाचा – कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे


 

First Published on: January 31, 2020 6:30 AM
Exit mobile version