Health tips : पिरियडची date मागे पुढे होतेय? ही आहेत कारणे

Health tips : पिरियडची date मागे पुढे होतेय? ही आहेत कारणे

अलीकड्या धावपळीच्या काळात महिलांना त्यांच्या करिअर, कुटुंबासोबतच आपल्या आरोग्याची देखील योग्य काळजी घ्यायला हवी. महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांची मासिक पाळी वेळेत येणं देखील गरजेचं असतं. मात्र, अनेक महिलांची मासिक पाळी वेळेत येत नाही. ठराविक तारखेच्या 5-6 दिवसानंतरही मासिक पाळी न आल्यास अनेकजणी टेंशनमध्ये येतात. मात्र, अनियमीत मासिक पाळी येण्यामागे नक्की काय कारण आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मासिक पाळी उशीरा येण्याचे कारण

ज्या महिला सतत तणावाखाली वावरतात त्यांना ही समस्या नक्कीच उद्भवते. तणावामुळे हार्मोन्स असंतुलतील होतात. ज्यामुळे मासिक पाळी उशीरा येते.

सतत आजारी असण्यामुळे देखील मासिक पाळी उशीरा येते. त्यामुळे शरीर नेहमी सुदृढ राहावे.

जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्यामुळे मासिक पाळीला उशीर होऊ शकतो, त्यामुळे दिवसभरात किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.

जेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते, तेव्हा मासिक पाळीला उशीर होऊ शकतो. हे टाळण्यासाठी पालक, मटार, ब्रोकोली, काळे, लाल मांस, अंडी आणि फॅटी फिश यांचा रोजच्या आहारात समावेश करा.

शरीराची हालचाल, व्यायाम कमी होणे किंवा अधिक व्यायाम केल्यामुळे देखील मासिक पाळीला उशीर होतो.

वजन कमी-जास्त झाल्यामुळे देखील मासिक पाळी उशीरा होऊ शकते.

अपूर्ण झोपेमुळे देखील तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो, म्हणून झोपण्याची वेळ निश्चित करा आणि त्याचे पालन करा.

जर तुमचा थायरॉईड कमी सक्रिय असेल तर त्यामुळे मासिक पाळी उशीरा येऊ शकते.

 


हेही वाचा :

सोशल मीडियामुळे स्ट्रेस येतोय? मग वापरा ‘या’ टिप्स

First Published on: April 3, 2023 12:49 PM
Exit mobile version