Friday, May 17, 2024
घरमानिनीRecipePoha Dosa : नाश्त्यासाठी पोह्याचे हेल्दी डोसे

Poha Dosa : नाश्त्यासाठी पोह्याचे हेल्दी डोसे

Subscribe

नाश्त्यामध्ये सतत पोहे, उपमा खाऊन कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळं खावसं वाटतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पोह्याचा डोसा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 1 कप तांदूळ
  • 1/2 वाटी पोहे
  • 1/2 कप दही
  • 2 चमचे उडीद डाळ
  • 1 चमचा मेथी दाणे
  • 1/2 साखर
  • आवश्यकतेनुसार तेल
  • चवीनुसार मीठ

कृती : 

Aval Dosa | Poha Dosa Recipe by Archana's Kitchen

- Advertisement -
  • डोसा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात तांदूळ,उडीद डाळ, मेथीचे दाणे एकत्र पाण्यात भिजत घाला.
  • यानंतर दुसऱ्या भांड्यात पोहे धुवून घ्या आणि दीड कप पाण्यात 5 तास भिजत ठेवा.
  • नंतर सर्व पदार्थ मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या आणि त्यात दही आणि थोडे पाणी घालून पीठ बनवा.
  • गरज असल्यास थोडे पाणी टाका. मीठ घालून मिक्स करा.
  • 10-12 तास हे मिश्रण राहू द्या. डोसा बनवण्यासाठी मंद आचेवर तवा गरम करा.
  • तव्याला थोडे तेल लावा. तव्यावर मिश्रण पसरवून त्याचे डोसे काढा.
  • हिरव्या चटणीबरोबर हा डोसा सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : टेस्टी पनीर-मशरूम पुलाव

- Advertisment -

Manini