वयाच्या 30 वर्षांनंतर high heels नको रे बाबा !

वयाच्या 30 वर्षांनंतर high heels नको रे बाबा !

हाय हिल्स तुमच्या पायाला एक वेगळेच सौंदर्य देते. ऑफिस असो किंवा कॉलेजला जाणाऱ्या असो, बहुतांश मुलींना हाय हिल्स घालणे फार आवडते. जरी आता तुम्ही हाय हिल्स घातल्याने सुंदर दिसत असाल. पण वयाच्या चाळीत पोहचल्यानंतर याच हिल्समुळे तुमच्या बोन हेल्थला नुकसान पोहचू शकते. ऐवढेच नव्हे तर तुमच्या शरिराच्या खालचा भागाला ही गंभीर दुखापत होते हे लक्षात ठेवा. जर तुम्ही दररोज हिल्स घालत असाल तर याचे दुप्षरिणाम ही जाणून घ्या.

ट्रेंन्डमुळे हाय हिल्स घालण्याची सवय
काही मुलींना हाय हिल्स घातल्यानंतर ऐवढे कंम्फर्टेबल वाटते की, त्या खुप वेळ सुद्धा घालू शकतात. ते घातल्यानंतर डान्स ही बिंधास्तपणे करतात. पण तु्म्ही कधी विचार केलाय का असे केल्यानंतर तुमच्या पायांना किती नुकसान पोहचत असेल?

हाय हिल्स या केवळ तुमच्या पायांनाच नव्हे तर तुमच्या पाठीचा मणका यावर ही परिणाम करते. खासकरुन वयाच्या ३० व्या वर्षानंतर हाय हिल्स घालणे नुकसानकारक ठरु शकते. हाय हिल्सचा ट्रेंन्ड पाहता त्या दीर्घकाळ घातल्यानंतर काय नुकसान होऊ शकते हे आम्ही तु्म्हाला सांगणार आहोत.

-पाठीच्या खालच्या भागात दुखते
स्टाइल फॉलो करण्याच्या नादात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. स्टायलिश दिसायचे असेल तर तुम्ही कंम्फर्ट झोनचा सुद्धा विचार करा. हाय हिल्स तुमच्या पायांना पूर्णपणे सपोर्ट देत नाही,. अशातच खुप वेळ हिल्स घातल्यानंतर ते काढतेवेळी पाय खुप दुखतात. खरंतर एका अभ्यासानुसार हाय हिल्स घातल्याने कंबर आणि कंबरेखालच्या संपूर्ण हिस्सा हा अधिक दुखतो.

-Calves मध्ये दुखते
Claves मध्ये दुखण्याचा अनुभव हा हाय हिल्स घातल्यानंतर तुम्हाला येतो. या स्थितीत काल्व्सच्या नस प्रबाभित होतात आणि खुप दुखते.

-टाचा दुखतात
फॅशनेबल आणि स्टाइलच्या नादात हाय हिल्स घातल्याने टाचा दुखतात हे मात्र नक्की. खरंतर हाय हिल्स या तुमच्या पायाच्या आकारानुसार तर बनवल्या जातात पण त्या योग्य फिट बसत नाहीत. त्याचसोबत त्यावर एक सामान्य वजन बनवून ठेवणे फार मुश्किल होते.

-लिगामेंट्सवर होतो परिणाम
सातत्याने हाय हिल्स घातल्याने तुमच्या लिगामेंट्सवर त्याचा परिणाम होऊ शकतो. ते हळूहळू कमजोर होतात. त्याच कारणास्तव पायांना दुखापत झाल्यानंतर लिगामेंट सहज तुटू शकतात. फॅशनच्या या जगात तुम्ही तुमच्या कंम्फर्टला अधिक महत्व देणे फार गरजेचे आहे.


हेही वाचा- वयाच्या पंन्नाशीनंतरही महिलांनी ‘अशी’ घ्यावी आरोग्याची काळजी

First Published on: April 29, 2023 3:08 PM
Exit mobile version