Holi 2022 Gujiya Recipes : मावा न वापरता ‘या’ स्टफिंग्स वापरुन तयार करा नैवेद्याच्या गोड करंज्या

Holi 2022 Gujiya Recipes : मावा न वापरता ‘या’ स्टफिंग्स वापरुन तयार करा नैवेद्याच्या गोड करंज्या

Holi 2022 Gujiya Recipes : मावा न वापरता 'या' स्टफिंग्स वापरुन तयार करा नैवेद्याच्या गोड करंज्या

होळीच्या दिवशी गुजिया हा गोडाचा पदार्थ प्रत्येक घरात बनवला जातो. गुजिया म्हणजेच आपल्या गोडाच्या करंज्या. होळीच्या दिवशी पुरण पोळी आणि गोडाच्या करंज्या देवाला आणि होलिका देवीला नैवेद्य म्हणून दाखवल्या जातात. करंज्या लहान मुलांना प्रसाद म्हणून वाटल्या जातात.  देशातील विविध भागात गोड करंज्यांना वेगवेगळी नावं आहेत. करंज्या हा कॉमन पदार्थ असला तरी प्रत्येक घरात त्याची चव ही वेगळी असते. अनेक ठिकाणी माव्याच्या करंज्या प्रसिद्ध आहेत. पण अनेक ठिकाणी रवा, बेसन, ड्रायफ्रूट, मूग डाळ घालून करंज्या केल्या जातात.  त्यामुळे त्याची चव प्रत्येक  ठिकाणी वेगळी लागते. आज आपण त्याच वेगवेगळ्या पद्धतींचे स्टफिंग्स भरुन गोड्याच्या कशा करायचे ते पाहणार आहोत.

बेसनाच्या कंरज्या

साहित्य – १-२ बेसनाचे लाडू किंवा बेसन, १ वाटी पिठीसाखर, वेलची, चिरलेले ड्रायफ्रूट, किसलेला नारळ

कृती – बेसनाच्या करंज्या तयार करण्यासाठी बेसनाचे लाडवांचा चुरा करुन घ्या. लाडू मिळाले नाही तर बेसन तुपात छान भाजून घ्या. बेसन थोड लाल झाल्यानंतर तुपात इतर साहित्यही भाजून घ्या. सगळं साहित्य एकत्र करुन त्याच सारण तयार करा आणि कंरज्यामध्ये भरा. अशा प्रकारे बेसनाच्या कंरज्या तयार.

रव्याच्या कंरज्या

साहित्य – १ वाटी रवा, १ वाटी बारीक चिरलेले ड्रायफ्रूट, वेलची, १०० ग्रॅम साखर, बडीसोफ, तूप

कृती – कढईत रवा सोनेरी होई पर्यंत भाजून घ्या. रवा थंड झाल्यानंतर त्यात साखर, बडीसोफ, वेलची, ड्रायफ्रूट मिक्स करा. त्यात थोडे तूप घावा. अशा प्रकारे रव्याच्या करंज्यांचं सारण तयार.


हेही वाचा –  Holi 2022 : रंगपंचमीला भांग चढली तर काय करायचे ?

First Published on: March 17, 2022 2:31 PM
Exit mobile version