बद्धकोष्ठतेवर करा घरगुती उपाय

बद्धकोष्ठतेवर करा घरगुती उपाय

बद्धकोष्ठतेवर करा घरगुती उपाय

बद्धकोष्ठतेचा त्रास अनियमित दैनंदिन क्रम आणि खाण्याच्या सवयीमुळे होणे ही एक साधारण बाब आहे. जेवल्यानंतर बसून राहणे आणि रात्रीच्या जेवणानंतर सरळं झोपणं यासारख्या सवयीमुळे बद्धकोष्ठता त्रास होत असतो. सध्या वर्क फ्रॉम होम असल्याने अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत आहे. कारण जेवल्यानंतर काही जण लगेच काम करत बसतात नाहीतर सरळ झोपतात. या सवयी बद्धकोष्ठतेसाठी जबाबदार असतात. त्यामुळे आज आपण बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय काय करता येतील हे जाणून घेणार आहोत.

सकाळी उठल्यानंतर नियमित अनोश्यापोटी सुक्या मेवातील ४ ते ५ काजू आणि तेवढेच मनुके खायचे. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होता.

तसेच रात्री झोपण्याआधी ६ ते ७ मनुके खाल्लाने देखील आराम मिळतो.

कोमट दुधामध्ये एरंडेल तेल मिसळून पिऊ शकता. हा बद्धकोष्ठतेवरचा चांगला उपचार असून यामुळे पोट साफ होते.

सकाळी उठल्यानंतर लिंबाचा रस आणि काळं मीठ पाण्यामध्ये टाकून प्या. यामुळे देखील पोट स्वच्छ होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय म्हणजे इसबगोलची भूसी आहे. रात्री झोपताना पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर देखील घेऊ शकता.

बद्धकोष्ठतेवर मध खूप फायदेशीर असून रात्री झोपण्याआधी एक ग्लासात एक चमचा मध मिसळून प्या. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठते दूर होण्यास मदत होते.

तसेच नियमित रात्री हरड किंवा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर प्यायल्याने देखील बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो. तसेच पोटात गॅस तयार होत नाही.

First Published on: June 22, 2020 6:00 AM
Exit mobile version