Recipe: घरच्या घरी असे तयार करा न्युटेला

Recipe: घरच्या घरी असे तयार करा न्युटेला

न्युटेलाचा विविध पदार्थांसाठी वापर केला जातो. सर्वसामान्यपणे आपण तो टोस्ट, पॅनकेक किंवा कोल्ड कॉफीमध्ये वापरतो. अशातच आज आपण घरच्या घरी न्युटेला कसे तयार करायचे याचीच रेसिपी पाहणार आहोत.

 

साहित्य
-हेजलनट्स 2 कप
-साखर 1/2 कप
-कोको पावडर 4 चमचे
-नारळाचे तेल 2 चमचे
-वनीला एक्सट्रेक्ट 1 चमचा

कृती
-सर्वात प्रथम हेजलनट्स भाजून घ्या. 10-15 मिनिटांपर्यंत भाजून झाल्यानंतर हेजलनट्सला एका शीट पॅनवर पसरवा.

-हेजलनट्स भाजून झाल्यानंतर ते थंड होऊ द्या. आता ते एका कापडावर घासा, जेणेकरुन त्याची टरफल निघतील.

-हेजलनट्ल मिक्सरमध्ये 5 मिनिटांपर्यंत वाटून घ्या आणि घट्ट, क्रिमी होईपर्यंत तसे करत रहा.

-आता यामध्ये तेल टाका आणि एक मिनिटांपर्यंत मिश्रण व्यवस्थितीत मिक्स करा. आता साखर, कोको पावडर आणि वेनिला एसेंस टाका.

-तयार करण्यात आलेली पेस्ट एका वेगळ्या भांड्यात काढा. त्यानंतर थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा.

-अशा प्रकारे तुम्ही होममेड न्युटेला तयार करू शकतात. तयार केलेला न्युटेला एका एअर टाइट कंटेनरमध्ये स्टोर करा जणेकरुन खराब होणार नाही.


हेही वाचा- Recipe: क्लासिक हमूस रेसिपी

First Published on: October 9, 2023 5:58 PM
Exit mobile version