शरीरावरील खाज थांबवण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ उपाय

शरीरावरील खाज थांबवण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ उपाय

शरीरावरील खाज थांबवण्यासाठी घरच्या घरी करा 'हे' उपाय

उन्हाळा सुरू झाला की उकाड्याने सगळेच हैराण होतात. घाम, चिकटपणा आणि त्यासोबत येणार वेगवेगळे आजार. त्यामुळे अनेकांना उन्हाळा नकोसा होतो. उन्हाळ्यात शरीराला घामामुळे खाज सुटते. सतत खाजवून खाजवून ती जागा लाल होते आणि चट्टे देखील उठतात. तसेच जास्त खाजवत राहिल्याने त्वचेला हानी पोहचू शकते. त्यामुळे आज आपण शरीरावरील खाज थांबवण्यासाठी घरच्या घरी काय उपाय करता येईल हे जाणून घेणार आहोत.

खोबरेल तेल लावा

त्वचेच्या कोरडेपणामुळे शरीराला खाज येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अशावेळेस खोबरेल तेल हे उपायकारक असते. शरीराला खोबरेल तेल चोळल्यामुळे आराम मिळतो.

कोमट पाण्याने आंघोळ करा

जर शरीरावर सर्वत्र खाज येत असेल तर कोमट पाण्याने आंघोळ करा आणि त्यानंतर शरीराला खोबरेल तेल लावा.

खाज थांबवण्यासाठी हे मिश्रण करा

मीठ, हळद आणि मेथी यांचे मिश्रण करा आणि हे मिश्रण आंघोळ करण्यापूर्वी पाच मिनिटे लावा. त्यानंतर आंघोळी करा यामुळे शरीरावरील खाज थांबवण्यासाठी मदत होईल.

पेट्रोलियम जेली लावा

शरीराची खाज कमी होण्यास पेट्रोलियम जेली मदत करते. तसेच त्वचा जर संवदेनशील असेल तर पेट्रोलियम जेली फारच उपयुक्त असते. त्यामुळे पेट्रोलियन जेलीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने त्वचेतील सौम्यता राखण्यास मदत होते.

 बेंकिग सोडा लावा

सोड्यातमध्ये थोडेसे पाणी घालून पेस्ट एकत्र करा आणि ती पेस्ट फक्त खाज येणाऱ्या भागावर लावा. पण जेव्हा त्वचेवर चिर गेली असेल किंवा जखम झाली असेल तर हा उपाय करू नका. बेकिंग सोडा शरीराच्या लहानशा भागावर येणाऱ्या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी उपयुक्त असतो. जेव्हा संपूर्ण शरीरावर खाज येत असेल तर कोमट पाण्यात कपभर सोडा टाकून आंघोळ करा.

कोरफडातील गर लावा

शरीरावरील खाज येत असलेल्या भागावर कोरफडातील गर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर यामुळे खाज कमी होण्यास मदत होईल.


हेही वाचा – उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या


 

First Published on: May 25, 2020 6:00 AM
Exit mobile version