Homestay वेळी ‘या’ चुका करु नका

Homestay वेळी ‘या’ चुका करु नका

जेव्हा आपण ट्रिपचा प्लॅन करतो तेव्हा आधी आपण कुठे स्टे करणार याचा शोध घेतो. तेथील स्टे अगदी सुरक्षित आहे ना हे सुद्धा पाहतो. फाइव्ह स्टार हे सुरक्षित असतीलच पण ते सर्वांच्या शिखाला परवडणारे नसते. अशातच काही लोक हॉटेल्सचे रेटिंग्स पाहतात आणि त्यानुसार स्टे करण्याचा निर्णय घेतात. पण अलीकडल्या काळात होम स्टे चा ट्रेंन्ड ही वाढला आहे. कारण येथे स्टे केल्यानंतर घरी राहिल्याचा फिल येतोच पण अधिक सुरक्षितही वाटते. अशातच तुम्ही सुद्धा होमस्टेचा ऑप्शन निवडला असेल तर पुढील काही चुका करणे टाळा. (Homestay tips)

होमस्टे करताना पुढील चुका टाळा
-जर तुम्ही एखाद्या होमस्टेमध्ये राहत असाल आणि तेथेच घरातील मंडळी सुद्धा राहत असतील तर जबरदस्तीने त्यांच्या घरात डोकावून पाहण्याची चूक करु नका.
-तुमच्या सुविधेसाठी ठेवण्यात आलेल्या नोकरांसोबत कधीच गैरवर्तवणूक करु नका.
-होमस्टे मध्ये राहिल्यानंतर तेथील वस्तूंची-सामानाची मोडतोड करु नका.
-होमस्टेवेळी तुम्हाला स्वतंत्र शॅम्पू, साबण किंवा टॉवेल दिले असतील तर कधीच घरी घेऊन जाण्याची चूक करु नका.
-किचनमध्ये चहा-नाश्ता बनवल्यानंतर तेथे अस्वच्छता झाली असेल तर ती जागा स्वच्छ करा.
-जर तुम्हाला रिव्यू लिहिण्यास सांगितला तर विनम्र भाषेत लिहा. (Homestay tips)

पुढील गोष्टींची घ्या काळजी
-होम स्टे करताना आधी त्याबद्दल अधिक माहिती मिळवा. आजकाल सोशल मीडियाचा जमाना असून तुम्ही त्या होम स्टे संबंधित रिव्यू वाचून ते बुक करा.
-बुक करण्यापूर्वी फोनवरुन तेथे काय काय सुविधा असतील त्याबद्दल विस्तृत जाणून घ्या.
-जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी आवश्यक फूड्स सोबत घेऊन जा.
-होमस्टे वेळी तेथील घरातील मंडळींच्या आवडी निवडी काय आहेत ते सुद्धा क्रॉस चेक करा.


हेही वाचा- लोणार सरोवराबद्दल ‘या’ रहस्यमय गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

First Published on: June 8, 2023 5:16 PM
Exit mobile version