Honeymoon destinations : हनिमूनसाठी ‘ही’ आहेत परफेक्ट रोमँटीक डेस्टीनेशन

Honeymoon destinations : हनिमूनसाठी ‘ही’ आहेत परफेक्ट रोमँटीक डेस्टीनेशन

Rashifal Today : 'या' ३ राशीचे लोक असतात खूप रोमँटिक

दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात झाली आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे अनेकांचा विवाहसोहळा रखडला होता.मात्र आता सर्व सुरळीत होताच अनेकांनी लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र लग्नानंतर बाहेर कुठेतरी जाण्याचं नियोजन करताना नक्की कुठे जायचं ? या प्रश्नाने सर्वांचाच गोंधळ उडत असतो. मग तुम्हीसुद्धा लग्न करताय ? हनिमूनसाठी कुठे जायचं हे ठरलं नाही का? मग हनिमूनसाठी खाली दिल्याप्रमाणे परफेक्ट रोमँटीक डेस्टीनेशन कोणती आहेत ? ते वाचा आणि ठरवा हनिमूनसाठी परफेक्ट रोमँटीक डेस्टीनेशन. याशिवाय भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि बजेट फ्रेंडली हनीमून डेस्टिनेशन जाणून घ्या.

उत्तराखंड – जर तुम्हाला बजेटमध्ये सुंदर आणि रोमँटिक ठिकाणी जायचे असेल तर उत्तराखंड सर्वोत्तम आहे. येथील नैनिताल हे सर्वोत्तम हनिमून डेस्टिनेशन्समध्ये मानले जाते. औलीमध्ये झिप लाइन, ट्रेकिंग, स्कीइंग यांसारख्या अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकता.

गोवा – पाम वृक्षांनी वेढलेला समुद्रकिनारा, प्राचीन चर्च  ही गोव्याची वैशिष्ट्ये आहेत. गोव्यात हनिमून साजरा करण्यासाठी अनेक समुद्रकिनारे आहेत.

केरळ – केरळ हे सुंदर हनिमून डेस्टिनेशन असून वर्षभर भारतीय आणि परदेशी पर्यटकांची गर्दी इथे पाहायला मिळते. या ठिकाणी पाण्यावर तरंगणाऱ्या हाऊसबोटचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.

अंदमान आणि निकोबार – या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यांवर पसरलेली वाळू, पामच्या झाडांना बांधलेले सावलीचे झुले, स्कूबा डायव्हिंग, काचेच्या बोटीची राइड आणि विंड सर्फिंग यामुळे हे परफेक्ट रोमँटीक डेस्टीनेशन आहे.

जम्मू आणि काश्मीर – जर तुम्ही दिल्ली-एनसीआर जवळ हनिमूनसाठी चांगल्या ठिकाणाच्या शोधात असाल तर, जम्मू आणि काश्मीर हा एक उत्तम पर्याय आहे. जम्मू-काश्मीरमधील ‘गुलमर्ग’ हे लव्ह बर्ड्ससाठी खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. बर्फाच्छादित उंच पर्वत, मुघल गार्डन्स आणि हिरवीगार दऱ्या हे येथील आकर्षणाचे मुख्य केंद्र आहेत.

दार्जिलिंग – दार्जिलिंगची गणना जगातील टॉप क्लास हिल स्टेशन्समध्ये केली जाते.  येथे तुम्ही सिंगमडी रोपवे, टायगर हिल्स, टॉय ट्रेन तसेच हिरवेगार परिसर आणि सुंदर चहाच्या बागांना भेट देऊ शकता.

कर्नाटक – कर्नाटकातील कुर्गला भारताचे ‘स्कॉटलँँड’ असेही म्हणतात. हे हिल स्टेशन हनिमून जोडप्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. याशिवाय तुम्ही येथे म्हैसूर, हम्पी, कुन्नूर, उटी आणि उडुपी सारख्या ठिकाणांनाही भेट देऊ शकता.

गुजरात – जर तुम्ही डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हनिमूनला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही गुजरातलाही जाऊ शकता. गुजरातमध्ये कच्छ हे सर्वोत्तम ठिकाण आहे. डेझर्ट सफारी आणि चंद्राच्या प्रकाशात वाळूवर रात्रीचे जेवण करण्याची मज्जा अनुभवता येईल.

राजस्थान– तुमचा हनीमून रोमँटिक आणि रॉयल करण्यासाठी राजस्थान हे एकमेव ठिकाण आहे.लेक क्रूझपासून ते वाळवंटात उंटाच्या सवारीपर्यंत अनेक गोष्टींचा आनंद लुटू शकता. जैसलमेर, उदयपूर, माउंटाबू सारखी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत .


हे ही वाचा – काय सांगता! Rakhi Sawant चा पती रितेश होता बिग बॉस १५ चा कॅमेरामॅन?


 

First Published on: December 2, 2021 2:42 PM
Exit mobile version