घरताज्या घडामोडीकाय सांगता! Rakhi Sawant चा पती रितेश होता बिग बॉस १५ चा...

काय सांगता! Rakhi Sawant चा पती रितेश होता बिग बॉस १५ चा कॅमेरामॅन?

Subscribe

राखीचं भांड फुटलं

ड्रामा क्विन राखी सावंतने बिग बॉस १५ च्या घरात तिच्या नवऱ्यासोबत प्रवेश केल्यापासून दररोज घरात एक नवीन ड्रामा पहायला मिळत आहे. राखीचा नवरा रितेश आणि राखी बिग बॉसच्या घरात हंगामा करत आहेत. दोघेही घरातील सदस्यांना हसवतात आणि त्यांच्यासोबत वाद देखील घातल आहेत. राखीच्या नवऱ्याची बिग बॉसमध्ये एंट्री झाल्यापासूनच रितेश खरचं राखीचा नवरा आहे का असा प्रश्न सर्वांना पडला होता. राखीने देखील रितेश तिचा पती आहे सर्वांना पटवून दिलं. दरम्यान राखीचं हे खोट आता सर्वांसमोर उघड होण्याची वेळ आली आहे. राखी लाईम लाइटमध्ये येण्यासाठी काहीही करू शकते हे सर्वांना माहिती आहे. राखीच्या नवऱ्याविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राखीचा सध्याचा बिग बॉसच्या घरातील कथित नवरा हा बिग बॉस १५ चा कॅमेरामॅन आहे अशी माहिती समोर आली आहे. विकेंडच्या वारमध्ये सलमानने देखील राखीला हा तुझा खरा नवरा आहे का असा प्रश्न विचारला होता. मात्र राखीने तेव्हा देखील रितेश तिचा नवरा असल्याचे पटवून दिलं होतं. मात्र आता राखीचं भांड फुटलं आहे.

- Advertisement -

द खबरीने दिलेल्या महितीनुसार, राखी आणि रितेशची सुरू असलेले केमिस्ट्री सर्वांना आवडत आहे मात्र रितेश हा राखीचा नवरा नसून बिग बॉस १५ चा कॅमेरामॅन आहे. खबरीने रितेशसाठी एक ट्विट केलं आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे ‘रितेश तु राखीचा नवरा असल्याच्या अफवा पसरवणं बंद कर. तु राखीचा नवरा नाहीतर बिग बॉस १५चा कॅमेरामॅन आहेस’.

- Advertisement -

राखी आणि रितेशच्या नात्याबद्दल प्रेक्षकांना देखील पहिल्या दिवसापासून शंका होती. राखी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते मात्र तिथे तिने कधीही सोशल मीडियावर रितेश सोबतचा  एकही फोटो कधीच शेअर केला नव्हता. राखीचा हा नवरा अचानक कुठून आला असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र राखीचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. आता राखी खोट बोलू शकत नाही अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.


हेही वाचा – The Railway Men: भोपाळ गॅस गळती दुर्घटनेवर आधारीत यशराज फिल्मची पहिली वेब सीरिज येणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -