cleaning tips : प्लास्टीकच्या चिकट आणि काळवंटलेल्या बादल्या अशा करा साफ

cleaning tips : प्लास्टीकच्या चिकट आणि काळवंटलेल्या बादल्या अशा करा साफ

आपल्या प्रत्येकाच्या घरात बाथरूम हा असतोच. परंतू बाथरूम साफ करताना यात असलेली भांडी किंवा मग प्लॅस्टिकच्या बादल्या या आपण विशेष लक्ष न देता साफ करत नाही. यासाठी ठराविक वेळ काढून त्याला घासून मग त्या साफ केल्या जातात. काहीजण आंघोळीसाठी बाथरूमची बादली वापरतात तर काही स्वच्छतेसाठी वापरतात.

पण दैनंदिन रोजच्या वापरामुळे बादली घाण होते किंवा पिवळी पडते. यावेळी ती बघायला पण छान वाटत नाही. अशावेळी घाणेरडी बादली जर आपल्या बाथरूम मध्ये असेल तर ती दिसायला देखील योग्य वाटत नाही.

या पद्धतीने तुम्ही 5 मिनिटांत प्लास्टिकची बादली घाणेरडी किंवा पिवळसर झाली असेल तर साफ करू शकता. जाणून घेऊया टिप्स-

१. बेकिंग सोडा वापरा-

बादलीवरती बेकिंग सोडा लावून घ्या. यानंतर यावर जरासे पाणी घाला. हे संपूर्ण मिश्रण बादलीच्या खालच्या बाजूला घासून घ्या. बादली स्वच्छ होईपर्यंत चांगले ब्रशने घासून घ्या.

२. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरा-

सर्व प्रथम, एका भांड्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाका ते चांगले मिक्स करून घ्या. यानंतर त्यात पाणी घालून मिक्स करा आणि बादलीत टाका आणि काही वेळ राहू द्या. साधारण 5 मिनिटांनंतर, क्लिनिंग ब्रशने बादली घासून स्वच्छ करून घ्या.

३.डिटर्जंट्सचा करा वापर-

डिटर्जंट हा सर्वात सामान्य प्रकारचा क्लिनिंग प्रकार आहे जो घरगुती आणि व्यावसायिक स्वयंपाकघरांमध्ये वापरले जातो. डिटर्जंट्समुळे घाण,चिकटपणा लगेच निघून जातो. तसेच प्लास्टिकची भांडी डिटर्जंट्सने लगेच स्वच्छ होतात.


हेही वाचा : 

Skin Care : आंघोळीसाठी ‘हे’ आहेत Best Body wash

First Published on: May 2, 2023 6:33 PM
Exit mobile version